File Photo  
Latest

Sallubhai : लग्न कॅटचं आणि चर्चा सलमानची! कोण होत्या सल्लूभाईच्या गर्लफ्रेन्ड्स?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिल्मी दुनियेत कॅट आणि विकीच्या लग्नाचीच जाेरदार चर्चा आहे; पण या लग्‍नापेक्षा सल्लूभाई (Sallubhai) जास्त चर्चेत आहे. आता सलमान म्हटलं की, तो आणि त्याची गाजलेली प्रेम प्रकरणं आता बाॅलिवुडविश्वात अख्यायिक होत चालल्या आहेत. कॅट-विकी लग्नापेक्षा सलमानची चर्चा का होतेय, हे जगजाहीर आहे. पण, केवळ कॅटचं लग्न आहे म्हणून तो चर्चेत आहे, असं नाही. तो चर्चेत असतो ते त्याच्या गर्लफ्रेन्डमुळे… तब्बल ९ गर्लफ्रेन्ड त्याच्या होत्या. चला तर जुनाच विषय नव्याने समजून घेऊ…

संगीता बिजलानी : बाॅलिवुडमध्ये सलमान खानचं (Sallubhai) पहिलं प्रेम म्हणजे संगीता बिजलानी असं आजही समजलं जातं. एकेकाळी दोघांच्यात इतकी जवळीकता वाढली की, दोघे जण लग्नापर्यंत पोहोचले होते. पण, काही कारणांमुळे दोघांमध्ये वितुष्ट आले. असं असंल तरी दोघे जण आजही चांगले मित्र आहेत.

सोमा अली : मूळची कराचीमध्ये जन्माला आलेली सोमा अली सलमानवर एवढी फिदा  होती की, १६ व्या वर्षीच सलमानला भेटण्यासाठी ती  मुंबईला आली. त्यानंतर तिने माॅडलिंग केले. तिने हळूहळू सलमानशी जवळीकता वाढवली. पण, तिचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

कॅटरिना कैफ : सध्या कॅटच्या लग्नामुळे सलमान जास्त चर्चेत आहे. पण, कॅट आणि सलमान खानचं नातं जगप्रसिद्ध आहे. कॅट ही बाॅलिवुडची सर्वात महागडी नटी आहे. 'मैंने प्यार क्यों किया', या चित्रपटापासून सल्लूभाई आणि कॅटमध्ये जवळकीता वाढली.  पण, जेव्हा लग्नाची वेळ आहे तेव्हा सगळं गणित फिस्कटलं.  कारण, सलमान तिच्याशी व्यवस्थित वागत नव्हता, असंही कारण समोर आलेलं होतं. त्यानंतर तिन रणबीर कपूरसोबतही डेट सुरू केलेले होते. आता विकी कौशलशी लग्न करत आहे.

क्लाॅडिया सिएस्ला : ही एक चांगली माॅडेल म्हणून पुढे आलेली होती. हिने अक्षय कुमारसोबत आयटन साॅंग केलेले आहे. आणि हो… क्लाॅडिया सिएस्ला सलमान खानची गर्लफ्रेन्डदेखील होती, अशा चर्चा बाॅलिवुडमध्ये रंगलेल्या होत्या.

एैश्वर्या राय :  सगळ्यात जास्त चर्चा ज्या प्रेम प्रकरणाची झाली, ती चर्चा होती सलमान आणि एैश्वर्याच्या प्रेमाची. हे प्रकरण बाॅलिवुडच्या इतिहासात नोंद झालेलं प्रेम प्रकरण आहे, असंच म्हणावं लागेल. एैश्वर्याबराेबरील नात्‍यात सलमान खूपच गंभीर हाेता.  पण, तो सक्सेस झाला नाही. कारण, एैश्वर्याबाबतीत सलमान सेटवर खूपच पाॅजेसिव्ह होत होता.

जरीन खान, एमी जॅक्सन, स्नेहा उल्लाल, लूलिया वंतूर, डेजी शाह, अशा माॅडेल्स आणि अभिनेत्री सल्लूभाईच्या जिंदगीत आल्या खऱ्या पण, त्यांच्याशीही सलमानचं प्रेम किनारी जाऊ शकलं नाही. यातील अनेक अभिनेत्रींना खुद्दल सलमानंच आणलेलं होतं. शेवटी सलमान सिंगल सिंगलच राहिला.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT