दिवाळी Pudhari
दिवाळी

Diwali 2024 : टेन्शन नको ! दिवाळीच्या साफ सफाईसाठी वापरा या सोप्या सोप्या ट्रिक्स

घरच्या साफ सफाईमध्ये या सोप्या सोप्या टिप्स जरूर अमलात आणा

अमृता चौगुले

दसरा संपला कि आपल्या सगळ्यांनाच वेध लागतात ते दिवाळीचे. सगळ्या सणांचा राजा समजला जाणारा हा दिव्यांचा उत्सव आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी फराळ तयार करण्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची असते ती घराची साफ सफाई. घरच्या साफ सफाईमध्ये या सोप्या सोप्या टिप्स जरूर अमलात आणा.

घरातील पडद्यांची अशी करा सफाई :

घरातील पडद्यांवर असलेली धूळ झटकली तरी हे पडदे अनेकदा मळलेले दिसतात. यावर उपाय म्हणून गरम पाण्यात व्हाईट व्हीनेगर आणि वॉशिंग पावडर टाकून पडदे काही काळ भिजवा. नंतर धुवून टाका. पडदे पुन्हा चमकू लागतील.

जुने टुथब्रश :

अरुंद जागा, टाईल्समधील जागा, पाण्याचे नळ स्वच्छ करण्यासाठी जुन्या टुथब्रशचा वापर करा.

लिंबू आणि बेकिंग सोडा :

किचनमध्ये सहज उपलब्ध असलेल्या या पदार्थांमुळे घर चकचक होण्यास मदत मिळते. हट्टी डाग, टाईल्स, किचनमधील डाग दूर करण्यासाठी या मिश्रणाचा वापर करा.

पंखे साफ करताना :

पंखे साफ करताना अनेकदा धूळ उडून पुन्हा स्वच्छ केलेल्या वस्तूंवर जाऊन बसते. हे टाळण्यासाठी पंखे साफ करायच्या झाडूला उशीच्या जुन्या कव्हरने हे सर्व पुसल्यास धूळ निघून जाईल.

गादी अशी करा स्वच्छ :

गादीवर बरीच धूळ असते. ही धूळ स्वच्छ करण्यासाठी एकतर व्हॅक्युमचा वापर करा. किंवा बेकिंग सोडा आणि व्हीनेगर यांचे मिश्रण घ्या. संपूर्ण गादीवर स्प्रे करा. त्यानंतर ब्रशने किंवा कपड्याने पुसून घ्या.


किचनमधले डाग असे घालवा :

किचनमधील डागांवर व्हाईट व्हीनेगरचा वापर करा. डागांवर व्हीनेगर स्प्रे करून काही काळ तसेच ठेवा. थोड्यावेळाने पुसून घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT