मुंबई : विधानसभा निवडणूका आणि दिवाळीचा सण एकत्रच आला असला तरी वाहन कर, इंधन दरवाढ, फटाक्यांसाठी लागणार्या कच्च्या मालाचे वाढलेले भाव यामुळे यंदा दिवाळीत फटाक्यांचा आवाजही महागला आहे. फटाक्यांची बाजारपेठ सज्ज झाली असली तरी किंमतीमध्ये मात्र १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.
दीपोत्सवाचे कुतूहल आबालवृद्धांपासून सार्वांनाच असते. या सणासाठी बाजारपेठटा सज्ज झाल्या आहेत. 'प्रकाशाचा सण' असलेलेल्या या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे फटाके, परंतु गतवर्षी प्रमाणे यंदाही फटाक्यांवर महागाईचे सावट असल्याचे दिसून येते. सर्वच प्रकारच्या फटाक्यांच्या साहित्याच्या दरामध्ये सरासरी १० ते १५ टक्के वाढ झाली असल्याचे मुंबईतील विक्रते सांगतात. देशात शिवाकाशी (तामिळनाडू) गावात फटाक्याची मोठी बाजारपेठ असून तेथेच उत्पादन होते. तेथून भिवंडी बाजारपेठेत फटाके येतात. मुंबईतील बहुतांश घाऊक विक्रेते भिवंडी येथून सर्व प्रकारचे फटाके आणतात, फटाक्यांचा दर्जा आणि आवाजाच्या बाबतीत शिवाकाशीच्या फटाक्याला ग्राहकांची सर्वोधिक मागणी असते असते. भायखळा, काळाचौकी, मशिद बंदर परिसर परेल, दादरसह उपनगरात फटाक्यांचे स्टॉल लागले आहेत. गेल्या आठ दिवसापासूनच या स्टॉलवर गर्दी असल्याचे दिसून येते. किटकॅट, पेन्सिल (स्मॉल) व बिगसह रॉकेट बिग, क्रॅक्लिगं स्पार्कलला (३० ग्रॅम) बाजारात ग्राहकांडून मागणी आहे. १२ सेंटिमीटरमध्ये ४ कलर स्पार्कल आहेत. याचबरोबर १ हजार नग अस लेली फटाक्यांची माळ ही २५० रुपये, दोन हजारांची माळ ५०० रुपये, तीन हजारांची ९०० रुपये व ५ हजारांची १२०० ते १४०० रुपयांना आहे.
दिवाळीसाठी फटाक्यांची विक्री ही रविवारी २७ तारखेपासून जोराने सुरू होईल ती भाऊबीजपर्यंत असेल. निवडणूक असल्याने यावर्षी मोठ्या फटाक्यांना मागणी जास्त आहे. पण मालाची आवक कमी आहे. मात्र दिवाळीत लागणारे इतर फटाक्यांचे साहित्य उपलब्ध आहेत. जीएसटी १८ टक्के, वाहन कर व विमा असे प्रत्येकी एक टक्का असे एकूण २१ टक्के सरकार घेते. इंधन दरवाढीचा परिणाम फटाक्याच्या साहित्यांच्या दरावर झाला आहे. याचा ग्राहकांना फटका बसत आहे.
- विलास शिंदे, विक्रेते, दत्तात्रय लाड मार्ग, काळाचौकी, मुंबई