पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील नोकरदारांपासून छोटी कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजन आपल्या बॉस, किंवा काम करत असलेल्या संस्थेकडून भेटवस्तू किंवा बोनसची वाट पाहत असतात. हरियाणातील एका फार्मा कंपनीच्या मालकाने दिवाळी बोनस म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या आहेत. कंपनीच्या या कृतीमुळे कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. (Diwali Gift)
कंपनीचे मालक भाटिया म्हणाले, काही महिन्यांपूर्वी जेव्हा आमची टीम वाढत होती, तेव्हा मी कर्मचाऱ्यांना सांगितले होते की तुम्ही आमचे स्टार आहात. आमची कंपनी हळूहळू विकसित झाली. आम्हाला वाटते आमच्या कर्मचाऱ्यांनी एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे रहावे. कारण प्रत्येक कर्मचारी आमच्यासाठी सेलिब्रेटी आहे. (Diwali Gift)
मलाही अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागले. पण मी मागे हटलो नाही. पूर्वी दिल्लीत माझे छोटेसे कार्यालय होते. मी 2015 मध्ये चंदीगडला आलो आणि एक छोटं ऑफिस विकत घेतलं. आमची कंपनी आपल्याला विकसित करेल, असे ज्यांना वाटले ते आमच्या सोबत आले. पुढे तेही स्टार झाले. स्वतःची कार असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळेच आम्ही कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला. (Diwali Gift)