दिव्येंदु शर्मा  
Latest

Mirzapur 3 : मिर्जापूर-३ मध्ये दिसणार नाही मुन्ना भैय्या; दिव्येंदु शर्मा म्हणाला…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकप्रिय वेब सीरीज मिर्जापूरमध्ये मुन्ना भैयाची भूमिका साकारलेल्या दिव्येंदु शर्मा आता मिर्जापूर ३ मध्ये दिसणार नाही. दिव्येंदुने एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. (Mirzapur 3) त्याने सांगितले की, तो तिसऱ्या सीजनमध्ये दिसणार नाही. त्याचे म्हणणे आहे की, आता या भूमिकेत त्याला घुटमळल्यासारखे होते. (Mirzapur 3)
दिव्येंदु म्हणाला- मी घोषित करतो की, मी मिर्जापूर सीजन ३ चा भाग असणार नाही.

दिव्येंदुच्या या स्टेटमेंट हे सिद्ध होते की, सीजन २ च्या शेवटी मुन्ना भैयाच्या भूमिकेचा मृत्यू झाला होता. तरीही चाहत्यांना वाटत होतं की, सीजन ३ मध्ये त्याची दमदार वापसी नक्की होईल. परंतु, आता दिव्येंदुने स्वत: या वृत्तांवर पूर्णविराम लावला आहे.

मुन्ना भैयाच्या भूमिकेबद्दल बोलताना दिव्येंदुने सांगितले की, माझ्यासाठी मुन्नाची भूमिका त्रासदायक ठरणारं होतं. पण, मी सुरुवाती पासून हे जाणलं होतं की, ही एक दमदार भूमिका आहे. मी सर्वात आधी बबलूच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. ण काही काळानंतर मी हे जाणलं की, मी मुन्नाच्या भूमिकेसाठी अगदी योग्य नाहीये. जेव्ही मी या भूमिकेत होतो, तेव्हा त्याचा परिणाम माझ्या व्यक्तिमत्वावर खूर रडला.

मिर्जापूरचा पहिला सीजन १६ नोव्हेंबर, २०१८ रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम करण्यात आलं होतं. यामध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा, दिव्येंदु शर्मा, विक्रांत मैसी, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी यासारखे कलाकार दिसले होते. दुसरा सीजन २३ ऑक्टोबर, २०२० रोजी स्ट्रीम करण्यात आलं होतं. आता तिसरा सीजन कधी प्रदर्शित होणार, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT