पुढारी ऑनलाईन : दिशा पटनी आणि हॉट फोटो हे समीकरण नेहमीचच झालं आहे. आपली सुपरफिट फिगर फ्लॉन्ट करण्याची एकही संधी दिशा सोडत नाही. यांचा प्रत्ययही नुकताच आला. दिशाने अलीकडेच अंबानी यांच्या घरी असलेल्या गणेश दर्शननिमित्त बॅकलेस ब्लाऊज घालत नेटीझन्सना चकित केलं होतं. अर्थात अशा प्रसंगी इतके रिव्हीलिंग कपडे घातल्यामुळे ती ट्रोलही झाली होती.
पण आताच्या तिच्या फोटोनी मात्र सोशल मिडियावर चांगलीच आग लावली आहे. व्हाईट कोर्सेट शॉर्टड्रेस तिने या फोटोत घातला आहे. यासोबत रेड लिपस्टिक आणि पेन्सिल हिल्स कॅरी केले आहेत. हे फोटो दुसऱ्याच अकाऊंटवरून शेअर केले गेले असले तरी नेटीझन्स तिला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही या फोटोंच्या खाली अनेकांनी कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. पण यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे ते नापसंतीच्या कमेंट्सचं. दिशाच्या या फोटोंवर अनेकांनी तिच्याकडे हे एकच टॅलेंट आहे असं म्हणत अनेकांनी टीका केली आहे.
तर एकाने ही अगदी वेट्रेस दिसते आहे अशी कमेंट केली आहे. तर यावर 'तू पॉर्नस्टार दिसते आहे' अशी कमेंट करत टीका केली आहे. याशिवाय आणखी एक सनी लिओनी तयार होते आहे अशा कमेंट्सचाही नेटीझन्सनी पाऊस पाडला आहे. दिशा आगामी कल्की, वेलकम टू जंगल, मलंग 2 या सिनेमांत दिसते आहे.