mouni roy-disha patani 
Latest

Disha Patani-Mouni Roy : दोन हॉट अभिनेत्री ट्रिपवर पोहोचल्या, फोटो पाहिले तर…(Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिवलग मैत्रीणी दिशा पटानी आणि मौनी रॉय ट्रिपवर गेल्या आहेत. दोघीही व्हेकेशन टाईमचा आनंद घेत आहेत. दिशा-मौनीच्या ट्रिपचे फोटो व्हायरल झाले असून त्यामध्ये दोघीही हॉट दिसत आहेत. (Disha Patani-Mouni Roy ) बी-टाऊनच्या गॉर्जियस अभिनेत्रींची चर्चा होत आहे. बेस्ट फ्रेंड असलेल्या दोघींचे वेकेशन ट्रिपचे लेटेस्ट फोटो पाहायला मिळत आहेत. (Disha Patani-Mouni Roy )

दरम्यान, बुधवारी 'ब्राह्मास्त्र' फेम अभिनेत्री मौनीने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम हँडलवर लेटेस्ट फोटोज शेअर केले आहेत. मौनी रॉयने लिहिलं – "सुट्टीचा आनंद आवडत्या तरुणीसोबत घेताना." मौनी सोबत लेटेस्ट फोटोमध्ये दिशा पटानी हॉट अंदाजात दिसत आहे. रेड बिकिनीमध्ये दिशाचा लूक खूप बोल्ड दिसत आहे. जेव्हा दिशा आणि मौनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, तेव्हा चाहत्यांकडून कॉमेंट्सचा पाऊस पडतो.

या चित्रपटात दिसणार दिशा

दिशा सुपरस्टार अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' (Welcome 3) आणि साऊथ सुपरस्टार सूर्याच्या 'कंगुवा' यासारख्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT