Latest

शेपूट गायब झाल्याचा मानवाला आजही त्रासच!

Arun Patil

न्यूयॉर्क : मानवी उत्क्रांतीचा इतिहास पाहिला तर मानवी शरीरात शेकडो बदल होत गेले असल्याचे दिसून येईल. माणसाचे शेपूटही गायब झाले, मणक्याचा पोक गेला. मात्र, शेपूट गायब झाल्याचा त्रास मानव आजही भोगत आहे. अडीच कोटी वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? माणसाची शेपूट कशी नामशेष झाली. याचा आता मानवावर काय परिणाम होतेय याबाबतची धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे.

'गुगल'वर आपण उत्क्रांती असा शब्द टाकला तर, मानवाच्या उत्क्रांती साखळी दाखवणारी छायाचित्रे दिसतात. यात माकडासारख्या प्राण्याच्या रूपात बदल होत जाताना चित्रात दिसतो. मानव हा माकडापासून उत्क्रांती होत विकसित झाला, असे डार्विनचा सिद्धांत सांगतो. पूर्वी मानवाला देखील माकडाप्रमाणे शेपटी होती. कालांतराने मानवी शरीरात शेकडो बदल होत गेले. या बदलांबरोबर मानवाला असलेली शेपटी देखील गायब झाली. तीन लाख वर्षांपूर्वी हवामानातील बदलामुळे 'होमो सेपियन्स आफ्रिकेत विकसित झाले. होमो सेपियन्स हाच आधुनिक मानव आहे. मानवाची उत्क्रांती झाली; पण शेपूट गायब झाल्याचा मोठा परिणाम मानवाच्या आरोग्यावर झाला आहे. आजही मानवाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. मानवाची उत्क्रांती नेमकी कधी, कशी आणि केव्हा झाली हा नेहमीच कुतूहलाचा विषय ठरला आहे. यावर अजही अनेक संशोधने केली जातात. यातून नवनवीन माहिती समोर येते. मानवाच्या उत्क्रांतीचा मानवाच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम झाला याबाबतही माहिती एका संशोधन अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मानवाच्या शरीरातून शेपटी हा अवयव गायब झाल्यामुळे याचा मानवावर अनुवंशिक परिणाम झाला. यामुळे मानवामध्ये अनेक अनुवंशिक दोष निर्माण झाले.

या अनुवंशिक दोषांमुळे मानवाला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतोय. शेपटी गायब झाल्याचा मानवाला शारीरिक त्रास भोगावा लागत आहेत. जगभरात 10 टक्क्यांपेक्षा कमी लोक हिमोफिलियासारख्या हजारो दुर्मीळ अनुवंशिक आजारांनी ग्रस्त आहेत. अनेकांना सिकलसेल रोग आणि सिस्टिक फायब—ोसिस यासारखे दुर्मीळ आजार होतात. अडीच कोटी वर्षांपूर्वी मानवाची उत्क्रांती होत असताना तो चार पायांवर न चालता थेट पाठीवर सरळ उभा राहिला यामुळे कालांतराने मानवाच्या पाठीला असलेली शेपूट गायब झाली असा सिद्धांत संशोधक मांडतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT