पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या लूक्स आणि फिटनेसने प्रेक्षकांची लाडकी बनलेली अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावरही लाईम लाईटमध्ये असते. दिशाच्या बीच लूक्सची चर्चाही होत असते. पण सध्या दिशा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. दिशा चर्चेत आहे ते तिच्या वडिलांमुळे. दिशाचे वडील जगदीश पाटनी हे राजकारणात नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसमधील पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.
जगदीश आता बरेली शहरातील महापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याचं समोर येत आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली असल्याचं समजतं. सध्या बरेली शहरात सगळीकडे जगदीश यांच्या नावाचे होर्डिंगसही लागले आहेत. जगदीश यांना काही पक्षांकडून तिकीट मिळाल्याच बोललं जात आहे. पण अजून कोणत्या पक्षाला प्राधान्य द्यावं याबाबतचा त्यांचा निर्णय झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. वडिलांच्या राजकारणाची चर्चा सुरू असतानाच दिशा आणि टायगर श्रॉफ या लव्हबर्डसची मात्र ताटातुट झाल्याचं समोर येत आहे. लग्नाच्या चर्चा विस्कटल्याने हे दोघेही वेगळे झाल्याचं बोललं जात आहे.