Latest

MVA Sabha : भाजप नागरिकांना ‘एप्रिल फूल’ बनवत आहे : धनंजय मुंडे

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप गेली १० वर्षे नागरिकांना एप्रिल फूल बनवत आले आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज (दि. २) महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे बोलत होते.

मुंडे म्हणाले की, सरकारच्या विरोधात कुणी काय बोललं तर घरात कधी पोलीस येतील याचा नेम नाही. सरकारविरोधात जो बोलेल त्याला विविध संस्थांच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न होत आहे. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. मागील १० वर्षाचं राजकारण पाहिलं तर राज्यातील आणि देशातील नागरिकांना खुळं कोणी केले असेल तर ते भाजपच्या कमळानं केलं आहे.

मराठवाड्यात महासंग्रामी भूमीतून ही वज्रमूठ एकत्र लढणार आहे. जनतेचा विकास हे सरकारचे काम आहे. मात्र, सध्या एकही आश्वासन पाळलं जात नाही. याउलट विरोधकांनी टीका केली तर त्यास उत्तर दिले जाते, अशी स्थिती आहे. राज्यातील उद्योग गुजरात निवडणुकीसाठी तिकडे पळवले गेले. महाराष्ट्राची अस्मिता जपायचे असेल तर वज्रमूठ आवळा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT