Devendra Fadanvis  
Latest

Devendra Fadnavis | मी पुन्हा येईन! फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ डिलीट; चर्चेला उधाण

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र भाजपने अचानकपणे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा 'मी पुन्हा येईन ' हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवर पोस्ट केल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का, अशी चर्चा सुरू झाली. पण अवघ्या तासाभरात भाजपने हा व्हिडिओ डिलीट केला. हा व्हिडिओ डिलीट केल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होवू लागले आहेत.

Devendra Fadnavis : "मी पुन्हा येईन"

"मी पुन्हा येईन" असा देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन व्हिडिओ शेअर केला होता. शेअर केलेला व्हिडिओ भाजपनं एका तासात डिलीट केला. महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीसांचा 'मी पुन्हा येईन ' हा व्हिडीओ पोस्ट केल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी आम्ही हा व्हिडीओ टाकत असून त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, हा व्हिडिओ डिलीट केला.

भाजपच्या पोस्टची चर्चा

उदय सामंत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन म्हटले होते. फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना आणि आम्हाला सोबत घेऊन आलेले आहेत. फडणवीसांच्या पुढाकाराने आम्ही सरकारमध्ये काम करत आहोत. भविष्यातील निवडणुकांमध्ये आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असे त्यांना म्हणायचे असेल. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपची ही कपटनीती असल्याचे सांगितले.

Devendra Fadnavis : काय होतं व्हिडिओमध्ये…?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन" ही कविता म्हटली होती. २०१९ च्या निवडणूक प्रचारातही हे वाक्य वारंवार वापरलं गेलं होतं. त्यानंतर ते वाक्य खूप चर्चेत आलं होत. शुक्रवारी (दि.२७) भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन "मी पुन्हा येईन" व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की,"मी पु्न्हा येईन. याच ठिकाणी, याच निर्धाराने, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!"

नितेश राणे : झोप उडवेल…

"मी पुन्हा येईन" व्हिडिओ शेअर केल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे," फक्त एक व्हिडिओ. जो मातोश्री आणि सिल्व्हर ओकची झोप उडवू शकतो. देवेंद्र फडणवीस हे नाव पुरेसे आहे" असं म्हणतं त्यांनी ही पोस्ट देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपला टॅग केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT