Latest

Dental Implant Surgery : पर्याय दातांच्या प्रत्यारोपणाचा…

Arun Patil

Dental Implant Surgery : दंत प्रत्यारोपण प्रक्रियेत कृत्रिम दातांची रांग ही हिरड्यात घट्टपणे बसवण्यात येते. डेंटल इम्प्लांट सर्जरी ही रुग्णाचे तोंड आणि हिरड्यांच्या स्थितीवर अवलंबून आहे. यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत.

डेंटल इम्प्लांट सर्जरीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तोंडात बसवलेल्या नव्या दातांमुळे अन्य दातांना ठोस आधार मिळतो.

सर्जरी कधी करावी? : एक किंवा त्यापेक्षा अधिक दात नसल्यास, जबडा आणि हिरड्यांचां योग्य विकास करण्यासाठी, खोट्या दातांमुळे त्रास होणे, आपल्या बोलण्याची पद्धत सुधारण्यासाठी, तोंडातील लाळ योग्य ठेवणे किंवा आरोग्यदायी राहणे.

Dental Implant Surgery : सर्जरी करण्यापूर्वी…

डेंटल इम्प्लांट सर्जरीचा यशस्वीपणा हा हिरड्यांच्या स्थितीवर अवलंबून आहे. साधारणपणे 98 टक्के ऑपरेशन्स यशस्वी होतात आणि ते आयुष्यभर राहतात. ऑपरेशन करणार्‍या व्यक्तीच्या हिरड्या चांगले असणे गरजेचे आहे. धूम्रपान करणार्‍या लोकांत अनियंत्रित क्रॉनिक डिसऑर्डर असतो. जसे मधुमेह, हृदयविकार आदी. याशिवाय आपण रेडिएशन थेरेपी घेत असाल, तर दंतवैद्यकांना त्याची माहिती देणे गरजेचे आहे. ऑपरेशनंतर काही जणांना थोडेसे अस्वस्थ वाटू शकते कारण ऑपरेशन करताना हिरड्यांत भूलीचे इंजेक्शन द्यावे लागते. जसजशी भूल उतरते, तसतसे काहीवेळा तो भाग दुखू लागतो. अशा प्रकारच्या ऑपरेशनमध्ये जोखीम कमी राहते. मात्र जरी त्रास झाला तरी तो नाममात्र असतो.

या सर्जरीनंतर दातांची सफाई करण्यासाठी विशेष ब्रश दिला जातो. या ब्रशने हळुवारपणे दात घासणे गरजेचे आहे. तसेच पुढील काळात डॉक्टरांकडून नियमितपणे दातांची तपासणी करावी. याआधारे इम्प्लांटेशननंतर झालेले बदल लक्षात येतील. सर्जरीनंतर बसवलेल्या दाताने कडक पदार्थ चावू नयेत. अधिक जोर दिल्यास कृत्रिम दात तुटण्याची शक्यता असते. तसेच तंबाखू, धुम्रमान करणे वर्ज्य करावे.

डॉ. निखिल देशमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT