डेनिमचा ट्रेंड कधीच संपणार नाही. आता तर डेनिम जॅकेटस्ची चलतीच आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे पॅटर्न, प्रिंट आणि कटस पहायला मिळते. लिली, प्रिंटस, फर कॉलर्स शिवाय टॉप स्टिच्ड जॅकेटस हे सध्या तरुणांच्या पसंतीस उतरले आहेत.
डेनिमची फॅशन कधीच संपणार नाही. त्यामुळे नवे नवे प्रयोग डेनिममध्ये होतात. या मोसमात लाँग आणि क्रॉप्ड स्टाईल बरोबर लिली प्रिंटस् जॅकेटस्ची चलती आहे.
सॉलिड डेनिम जॅकेट : डेनिम जॅकेटमध्ये ही स्टाईल क्लासिक आहे. कोणत्याही ड्रेसवर, टी शर्टवर आणि जीन्सवर घालता येते. त्याबरोबर सोन्याचे दागिने आणि ग्लिटर बूट घालावे. लांब किंवा ढिल्या मापाचे डेनिम जॅकेटस्ची खासियत म्हणजे त्यांच्या लांबीमुळे ते कोणत्याही शरीर ठेवणीवर चांगले दिसते.
क्रॉप्ड डेनिम जॅकेट : क्रॉप्ड स्टाईलमुळे व्यक्ती बारीक दिसते. टी शर्ट आणि टॉप उठून दिसते. क्रॉप्ड किंवा आखूड जॅकेटबरोबर हाय वेस्ट किंवा फिटेड जीन्स वापरावी.
लिली प्रिंट : बॉयफ्रेंड फिट आवडत असेल तर डेनिम जॅकेटवर गर्ली स्पिन आवडून जाईल. डेनिमवर लिली प्रिंट असेल तर रेग्युलर जॅकेटला ट्रेंडी लूक देते. संपूर्ण काळ्या रंगाचे कपडे असतील तर डेनिम जॅकेट आकर्षक दिसतात.
टॉपस्टिच्ड : क्रॉप्ड ब्लॅक डेनिम जॅकेटमध्ये टॉप स्टिच डिटेलिंद असेल तर हे खूप सुंदरच दिसते. उठावदार, पण रंगीबेरंगी फुलांच्या प्रिंट किंवा रेषा यांच्याबरोबर वापरता येते. मेटालिक डिटेल्स असलेले घोट्यापर्यंतचे बूट यावर अगदीच उठून दिसतात.
फॉक्स फर कॉलर : यामध्ये मनगटाजवळ धातूचे झिपर आणि बाह्यांच्या मागे स्लिट डिटेल्स असतात. कॉलेज फेस्ट, सुट्टीचे फिरायला जाताना हे जॅकेट उत्तम निवड ठरेल.