पुढारी ऑनलाइन डेस्क : Delhi's Rohini Court : दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने रविंदर कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 6 वर्षांच्या मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खून केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. एएनआयने ट्विट करून याची माहिती दिली आहे.
2008 ते 2015 या कालावधीत 30 मुलांचे अपहरण आणि हत्या करण्यात त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. केवळ तीन प्रकरणांची चाचणी घेण्यात आली.