Latest

कलानिधी मारन यांना 380 कोटी द्या, दिल्ली हायकोर्टाचे ‘स्पाईस जेट’ला आदेश

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हवाई वाहतूक क्षेत्रातील 'स्पाईस जेट' कंपनीने पूर्वाश्रमीचे प्रवर्तक कलानिधी मारन यांना 380 कोटी रुपये अदा करावेत, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. मारन हे दक्षिण भारतातील सन उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा आहेत.

स्पाईस जेटने आपल्या मालमत्तेची कागदपत्रे महिनाभराच्या कालावधीत सादर करावी, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे स्पाईस जेटचे विद्यमान प्रवर्तक अजय सिंग यांना धक्का मानला जात आहे. ज्या कंपन्यांनी विमाने भाड्याने दिलेली आहेत, त्यांच्यासोबतही स्पाईस जेटचा वाद सुरू आहे. परिवर्तनीय वॉरंटस तसेच प्राधान्य समभागांच्या मुद्द्यावर दिलेली आश्वासने स्पाईस जेटने पाळली नसल्याचा आरोप करत मारन व त्यांच्या केएएल एअरवेजने न्यायालयात धाव घेतली होती.

स्पाईस जेटकडून आपले 579 कोटी रुपयांचे येणे होते. पण वादाच्या काळातले 380 कोटी रुपयांचे संचित व्याजही दिले जावे, असे मारन यांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT