deepika padukon  
Latest

Deepika Pudkone : गुपचुपपणे दीपिका भूतानला, व्हेकेशन ट्रीपचे फोटो आले समोर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका पादुकोण स्टारर पठाणने बॉक्स ऑफिसवर जादू केल्यानंतर तिने परदेश दौरा केलाय. ती सध्या भूतानच्या व्हेकेशन दौऱ्यावर असून व्हेकेशन ट्रीपचे फोटो व्हायरल झाले आहेत. दीपिका (Deepika Pudkone) ऑस्कर आणि दुसऱ्या इवेंटमध्ये बिझी आहे. कामातून वेळ काढून ती भूतानच्या ट्रीपवर गेलीय. दीपिकाचे काही फोटोज व्हायरल होत असून यापैकी एका फोटोत ती भूतानमधील एका ग्रपसोबत फोटो काढताना दिसतेय. काही लोक तिच्यासोबत सेल्फी घेत असताना दिसताहेत. दीपिकाने व्हाईट आऊटफिट घातलेले दिसत आहे तसेच सनग्लासेस घातलेले दिसत आहे. एका दुसऱ्या फोटोमध्ये ब्लॅक ड्रेस आणि बॅग कॅरी केलेले दिसत आहे. ती कॅमेराकडे पाहत आहे. तिच्यासोबत एक महिला आहे. ती नो मेकअप लूकमध्ये दिसतेय. (Deepika Pudkone)

दीपिकाच्या फॅनपेजवर हे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. एकाने कॅप्शन लिहिलीय की-ती डिझर्व्ह करते. तिच्या खासगी गोष्टींचा सम्मान आहे. ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन दोन्ही पोस्टमध्ये लोकेशन टायगर्स नेस्ट तकसंग, पारो, किंगडम ऑफ भूतान लिहिलं आहे.
रेस्टॉरंट स्टाफ सोबत फोटो

योर कॅफे रेस्टा्ररंटने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर दीपिका आणि स्टाफचा फोटो शेअर केला आहे. तिने व्हाईट आऊटपिट घातलाय. डार्क सनग्लासेस घातले आहेत. ती हसताना दिसतेय. आणि फोटो क्लिक करताना दिसते. यासोबत लिहिले आहे-'पुंग हेरिटेजमध्ये आला, यासाठी तुमचे धन्यवाद. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराची सेवा करू शकलो, तुम्ही खूप डाऊन टू अर्थ आहात.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT