Deepika Padukone 
Latest

Deepika Padukone : ‘फायटर’ च्या ट्रेलर लाँचला दीपिका उपस्थित नव्हती; कारण आलं समोर?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) , अभिनेता हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांच्या आगामी 'फायटर' चित्रपटाचा धमाकेदार, अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलर पाहून चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केलं आहे. ट्रेलरनंतर चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान 'फायटर' ची मुख्य अभिनेत्री दीपिका पादुकोण ट्रेलरच्या लाँचिग सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही. आता याचे खास कारण समोर आलं आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या ( Deepika Padukone ) 'फायटर' चित्रपटाचा ट्रेलर आज १५ जानेवारीला म्हणजे, आर्मी डेला रिलीज करण्यात आला आहे. या सोहळ्याला सर्व कलाकारांनी हजेरी लावली होती मात्र, दीपिका पादुकोण कोठेही दिसली नाही. दरम्यान दीपिकाने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर 'फायटर' च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित का राहू शकली नाही? याबद्दलची माहिती देणारी एक पोस्ट शेअर केलीय.

या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की, 'माझ्या स्क्वाड्रनला मी मिस करेल… टीमला भरभरून शुभेच्छा.' याशिवाय तिने #Fighter #FighterTrailer असे हॅसटॅगदेखील दिलं आहेत. दरम्यान तिने पोस्टसोबत आजारी असल्याचा ईमोजी शेअर केलं आहेत. मात्र, खरोखरंच दीपिका आजारी आहे की नाही? याबद्दलची अध्याप अधिकृत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, 'फायटर' चित्रपटात दीपिकाच्या भूमिकेला कमी जागा मिळाल्याने तिच्यात आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याच्यांत किरकोळ मनतभेद झाले आहेत. यामुळेच दीपिका ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित राहिली नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान अजूनही सिद्धार्थ आनंद आणि दीपिकाने एकमेकांना अनफॉलो केलं आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनीच्या मुहूर्तावर म्हणजे, २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दीपिका 'फायटर'नंतर साऊथ स्टार प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'कल्की' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 9 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती अमिताभ बच्चनसोबत 'द इंटर्न' मध्ये दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT