deepika with fitness trainer  
Latest

Bollywood Fitness Trainer : दीपिका ते करीनापर्यंतच्या फिटनेस ट्रेनर आहेत तरी कोण

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिटनेस आणि वेलनेसच्या जगात सेलिब्रिटींना फिट ठेवण्यासाठी ही खास योगा प्रशिक्षक अनेक बड्या कलाकारांना फिट ठेवते.

(Bollywood Fitness Trainer ) कलाकारांची लाईफस्टाईल बघता त्यांना रोजच्या जीवनात फिट राहावं लागतं आणि यासाठी त्यांना ट्रेन करतात. केवळ सेलिब्रिटी ना नाही तर अनेकांना फिटनेसची आवड लावणारी या आहेत खास योगा प्रशिक्षक! (Bollywood Fitness Trainer )

रुपल सिद्धपुरा फारिया

रुपल सिद्धपुरा फारिया ही एक प्रसिद्ध सेलिब्रिटी योगा प्रशिक्षक आणि दूरदर्शी फिटनेस ट्रेनर आहे. फिट राहण्यासाठी आणि जगण्यासाठी त्यांनी आजवर अनेक कलाकारांना ट्रेन केलं आहे. तिच्या फिटनेस कौशल्याने राधिका आपटे, अनुराग कश्यप, झोया अख्तर, सैफ अली खान, रितेश देशमुख आणि श्वेता बच्चन यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांना फिट ठेवलं आहे. विशेष म्हणजे करीना कपूर, सोहा अली खान आणि सुरवीन चावला यांच्यासह गरोदर स्त्रियांसाठी रुपल ने खास प्रशिक्षण दिलं आणि ती क्षेत्रातील एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून ओळखली जाते.

यास्मिन कराचीवाला

यास्मिन कराचीवाला हे फिटनेस इंडस्ट्रीतील एक प्रमुख नाव आहे जे तिच्या पिलायेट आणि योगामधील निपुणतेसाठी ओळखले जाते. दोन दशकांहून अधिक अनुभवासह, यास्मिनने आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांसारख्या ए-लिस्ट बॉलीवूड स्टार्ससोबत काम केले आहे.

अंशुका परवानी 

अंशुका परवानी ही प्रसिद्ध योग प्रशिक्षक आहे. हिने योग समुदायात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अंशुकाच्या क्लायंट लिस्टमध्ये दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे या नावांचा समावेश आहे.

नम्रता पुरोहित

नम्रता पुरोहित ही एक तरुण आणि योग प्रशिक्षक आहे, जी तिच्यामधील कौशल्यासाठी सर्वत्र ओळखली जाते. नम्रताने सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांसारख्या तरुण सेलिब्रिटींना ट्रेन केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT