सांतीयागो : पुढारी ऑनलाईन चिलीमध्ये जंगलात लागलेला वणवा आता नागरी वस्त्यांच्या दिशेने आला असून आतापर्यंत ६४ जणांचा या वणव्यात होरपळून मृत्यू झाला आहे.
चिलीच्या जंगलात दोन दिवसांपूर्वी वणवा भडकला असून एकूण ९२ ठिकाणी वणवा पसरत चालला आहे. त्यामुळे ४३ हजार हेक्टरवरील जंगल पूर्णपणे खाक झाले आहे. हा वणवा जंगलानजीकच्या वसाहतींनाही गिळंकृत करीत असून, आतापर्यंत ११०० घरांचे नुकसान झाले आहे. चिली सरकारने आग विझविण्याच्या कामाला प्रारंभ केला असला तरी हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. १९ हेलिकॉप्टर आणि अग्निशमन दलाचे ५०० जवान या कामात गुतले असून सर्वाधिक नुकसान व्हेल्परायसो भागात झाले आहे. व्हेल्परायसो, ओ हिगीन्स आणि लॉस लागोस या ठिकाणी आगीच्या तावडीतून हलवलेल्या हजारो लोकांना ठेवण्यात आले आहे.