Latest

David Miller: मिलरवर कोसळला दुःखाचा डोंगर, मुलीचे आकस्मिक निधन

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड मिलर (david miller) सध्या आपल्या संघासह भारत दौऱ्यावर आहे. येथे दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतासोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. दरम्यान, एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. डेव्हिड मिलर याच्या मुलीचे नुकतेच निधन झाले आहे. मिलरने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली. मिलरची मुलगी दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होती अशी माहिती समोर येत आहे.

मुलीचा एक छोटा व्हिडिओ शेअर करत मिलरने (david miller) म्हटलंय की, 'माझ्या प्रिय राजकुमारीला श्रद्धांजली. तुझ्यावर प्रेम नेहमीच असेल! प्रिय स्केट तू नेहमीच माझ्या आठवणीत राहशील. तू लढण्याची जिद्द एका वेगळ्या पातळीवर नेलीस. जगण्याच्या संघर्षात नेहमीच सकारात्मक राहिलीस आणि चेहऱ्यावर हासू ठेवलेस. तू मला खूप काही शिकवलेस.'

मुलीचा भावनिक व्हिडिओ शेअर

मिलरने (david miller) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुलीचे अनेक फोटो दिसत आहेत. ज्यामध्ये ती क्रिकेट खेळताना दिसत आहे. या दु:खद घटनेनंटर जगभरातील अनेक खेळाडूंनी मिलरचे सांत्वन करत श्रद्धांजली वाहिली आहे.

मिलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये

मिलरबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. सध्या टीम इंडियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने शानदार शतक झळकावले. याशिवाय एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने शानदार अर्धशतक झळकावले. इतकेच नाही तर त्याने गुजरात टायटन्सला आयपीएल 2022 मध्ये पहिले विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. मिलरने आतापर्यंत एकूण 147 वनडे आणि 107 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 5 शतके आणि 18 अर्धशतकांसह 41 च्या सरासरीने 3614 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने टी-20 मध्ये 2069 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर दोन शतके आणि 5 अर्धशतके आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT