file photo  
Latest

प्रियकराच्या मदतीने मुलीनेच केला विधवा आईचा खून, प्रेमात अडथळा ठरल्याने संपवले!

रणजित गायकवाड

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : अहेरी येथे वास्तव्य करणाऱ्या एका विधवा महिलेचा तिच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची घटना आज (दि. 19) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. निर्मला चंद्रकांत आत्राम (वय 52) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलगी उर्मिला चंद्रकात आत्राम (22) आणि तिचा प्रियकर रुपेश येनगंधलवार (22) यांना अटक केली आहे.

मूळची भामरागड तालुक्यातील रहिवासी असलेल्या निर्मला आत्राम हिचे पती चंद्रकांत आत्राम हे गडचिरोली पोलिस दलात कार्यरत होते. सन 2000 जिमलगट्टा परिसरात नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले होते. त्यानंतर ती आपल्या तरुण मुलीसह अहेरी येथील बेघर वसाहतीत वास्तव्य करीत होती. अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात एसपीओ म्हणून काम करुन ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती.

शुक्रवारी (दि. 19) सकाळी तिचा मृतदेह गळा आवळलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी निर्मलाची मुलगी उर्मिला आणि रुपेश येनगंधलवार या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी खुनाची कबुली दिली. या दोघांचे प्रेमसंबंध होते. परंतु निर्मला आत्राम हिचा अडथळा नको म्हणून तिचा दोघांनी खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात अहेरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT