दै. पुढारी एज्‍यू दिशा प्रदर्शन  
Latest

करिअरचा राजमार्ग आजपासून होणार खुला; दै. ‘पुढारी’ एज्‍यू दिशा प्रदर्शनाचे आज उद्घाटन; नामांकित शिक्षण संस्‍थांची माहिती एकाच छताखाली

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणार्‍या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दहावीच्या निकालाचे वेध विद्यार्थ्यांसह पालकांना लागले आहेत. 'दै. पुढारी एज्यू दिशा' या तीन दिवसीय शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यभरातील नामांकित शैक्षणिक संस्थांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी करिअरचा नवा राजमार्ग आजपासून खुला होणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते व संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील, प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी, लातूरचे प्रा. प्रमोद घुगे, एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, पुणेचे प्रा. डॉ. राजेश जाधव, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणेचे प्रा. स्वप्निल सोनकांबळे, अशोकराव माने ग्रुप, वाठार तर्फ वडगावचे चेअरमन विजयसिंह माने आणि चाटे शिक्षण समूह, कोल्हापूरचे प्रमुख प्रा. भरत खराटे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

दहावी, बारावीनंतर पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याची काळजी पालकांना असते. त्यासाठी ते विविध पर्याय व मार्गांच्या शोधामध्ये असतात. याचसाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत 'दै. पुढारी एज्यू दिशा' विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेणारे शैक्षणिक प्रदर्शन शनिवार, दि. 27 पासून राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक असून प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी, लातूर हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणे सहयोगी प्रायोजक आहेत. अशोकराव माने ग्रुप, वाठार तर्फ वडगाव व चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर सहप्रायोजक आहेत.

शैक्षणिक प्रदर्शनात तीन दिवस विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानमाला आयोजित केली आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडचणी व शंकांचे निरसन करणार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे उच्च ध्येय उराशी बाळगलेल्या विद्यार्थी व पालकांना यानिमित्ताने पाठबळ मिळणार आहे.

प्रदर्शनात महाविद्यालयीन प्रवेश, दहावी बारावीनंतरच्या शिक्षणाचे विविध पर्याय, तसेच कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिक, व्यवस्थापन, औषण निर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरा मेडिकल, आर्किटेक्चर, अ‍ॅग्रीकल्चर, माहिती- तंत्रज्ञान, बायो-टेक्नॉलॉजी, अ‍ॅनिमेशन तसेच व्हीएफएक्स यासह अन्य अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. यासह जेईई, नीट, सीईटी यासह अन्य स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करणार्‍या संस्था प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

रिलायन्स अ‍ॅनिमेशन स्टुडिओतर्फे उद्या मोफत अ‍ॅनिमेशन फिल्म मेकिंग कार्यशाळा

अ‍ॅनिमेशन हे कल्पकतेला व सर्जनशीलतेला विकसित करणारी एक कला आणि तंत्रज्ञान यांचे संगम असलेले कौशल्य आहे. दै. 'पुढारी'च्या वतीने कौशल्य विकासाची कार्यशाळा 16 ते 22 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी रविवारी (दि. 28) दुपारी 2.30 ते 4.30 यावेळेत होणार आहे. कार्यशाळेत रिलायन्स अ‍ॅनिमेशन स्टुडिओचे सीईओ तेजोनिधी भंडारे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा सर्वांसाठी खुली व मोफत आहे. कार्यशाळेस येताना चित्रकलेचे कागद, रंगीत खडू किंवा पेन्सिल, कात्री, कागद चिकटवण्यासाठी डिंक आदी साहित्य सोबत आणावे. कार्यशाळेसाठी पुण्यातील सृजन कॉलेज ऑफ डिझाईन व रिलायन्स अ‍ॅनिमेशन स्टुडिओ यांचे सहकार्य लाभले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT