Daily Horoscope 
Latest

आजचे राशिभविष्य (दि.१४ ऑगस्ट २०२२)

दिनेश चोरगे

मेष ः आपले सर्वांशी चांगले संबंध असणार आहेत. व्यवसायातील वाढीमुळे आपण आनंदित राहणार आहात. आपल्या कार्यक्षेत्रात सुधारणा होणार.

वृषभ ः नोकरीमध्ये खूप काम असल्यामुळे जास्त धावपळ होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जाणवणार आहे. नोकरीमध्ये सहकार्य कमी मिळणार.

मिथुन ः तुमची सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाणार आहे. तुम्हाला एखादी आनंदाची बातमी समजू शकते.

कर्क ः तुमच्या वैयक्‍तिक मार्गदर्शनाने तुमचे नातेसंबंध सुधारणार आहेत.घरातील व्यक्‍तींची आपल्याला हवी तशी साथ मिळणार आहे.

सिंह ः आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे. आपल्या कार्यक्षेत्राच्या बाबतीत योग्य व्यक्‍तीशी विचारविनिमय होणार आहे.

कन्या ः आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून टाका. सकारात्मक विचारांनी व्यवसायामध्ये वाढ होऊन, आर्थिक फायदे होणार आहेत.

तूळ ः कार्यक्षेत्रामध्ये आपण उत्साहाने काम करणार आहात. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी येण्याची शक्यता आहे.

वृश्‍चिक ः आज आपल्या मनावर कसला तरी मानसिक ताण असणार आहे. व्यवसायातील घडामोडींचा दूरपर्यंत विचार करून पुढचे निर्णय घ्या.

धनु ः सहज म्हणून मित्रांशी संवाद साधाल. आपल्याला आनंद मिळणारच आहे; शिवाय काही नवीन माहिती मिळाल्यामुळे प्रगती होण्याची शक्यता.

मकर ः मनातील उदासीनता दूर करा. तुमच्या उदासीनतेवर तुम्ही मात करणार आहात. कामाला उत्साहाने सुरुवात केल्याने त्याचे चांगले फायदे होणार आहेत.

कुंभ ः आपल्या हातून मोठी कामे होणार आहेत. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. आज आपला अध्यात्माकडे ओढा असणार आहे.

मीन ः आपले मनोबल उत्तम ठेवणे फार आवश्यक आहे; अन्यथा कामांमध्ये चुका होतील. व्यापार-व्यवसायात चांगले लक्ष द्या. आर्थिक प्रमाण ठीक ठाक असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT