भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याने कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट जिंकत इतिहास घडवला आहे. ही जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा तो जगातील सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. 
Latest

ग्रँडमास्टर डी गुकेशने इतिहास घडवला..! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला सर्वात युवा खेळाडू

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याने कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट जिंकत इतिहास घडवला आहे. ही जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा तो जगातील सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. तसेच विश्वनाथन आनंद यांच्‍यानंतर कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा दुसरा भरतीय बुद्धीबळपटू ठरला आहे. तसेच ४० वर्षांपूर्वी गॅरी कास्पारोव्ह यांचा विक्रम मोडून जागतिक विजेतेपदासाठी सर्वात तरुण आव्हानवीर ठरला आहे. आता जागतिक विजेतेपदासाठी गुकेशचा सामना विद्यमान जगज्जेत्या डिंग लिरेन याच्‍याशी होईल.

कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट स्‍पर्धा कॅनडातील टोरंटो येथे झाली. रविवारी डी गुकेशने अमेरिकेच्या ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराविरुद्धचा अंतिम फेरीचा सामना अनिर्णित केला. ग्रँडमास्टर्स फॅबियानो कारुआना आणि इयान नेपोम्नियाची यांच्यातील सामना रोमहर्षक ड्रॉमध्ये संपुष्टात आल्याने गुकेशला शेवटच्या दिवशी उमेदवारांचे विजेतेपद मिळवण्यासाठी तेवढीच गरज होती.

त्‍याने कठीण परिस्‍थिती योग्‍यरित्‍या हाताळली : विश्वनाथन आनंद

मार्गदर्शक विश्वनाथन आनंद यांनी गुकेशचे अभिनंदन करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्‍ट केली आहे. त्‍यांनी म्‍हटलं आहे की. "गुकेश संपूर्ण स्पर्धेत कठीण परिस्थिती कशी हाताळू शकला – हे गुण त्याच्या अनुभवी नाकामुराविरुद्धच्या अंतिम फेरीच्या ड्रॉमध्ये स्पष्ट झाले."
गुकेश हा १२ वर्षांचा असताना ग्रँडमास्टर बनला होता. ऑक्टोबर 2023 मध्ये त्याच्या आपले गुरु विश्वनाथन आनंद यांना मागे टाकत १७ व्‍या वर्षीच देशातील अव्वल-रँकिंग बुद्धीबळपटू बनला होता.

शनिवारी उपांत्य फेरी संपल्यानंतर गुकेश आघाडीवर होता. त्याने फ्रान्सच्या नंबर 1 फिरोज्जा अलीरेझाला हरवून संथ सुरुवातीपासून सावरले. त्‍याने संभाव्य 13 पैकी 8.5 गुण मिळवले. अमेरिकेच्या इयान नेपोम्नियाची, हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारुआना यांच्यापेक्षा अर्धा गुण मिळवला आहे. नाकामुराचे आक्रमक डावपेच आणि स्थिती गुंतागुंतीचे करण्याचा प्रयत्न असूनही, गुकेश स्‍थिर राहिला. एक टर्निंग पॉइंट आला जेव्हा नाकामुरा, कदाचित जिंकण्याचे दडपण जाणवत होते, त्याने आपले स्थान जास्त वाढवले. गुकेश नाकामुराविरुद्ध जिंकला असता तर अंतिम निकाल आधी आला असता. मात्र गुकेशने नाकामुराला बरोबरीत रोखण्‍यात यश मिळवले.

आता सर्वांचे लक्ष जागतिक विजेतेपद स्‍पर्धेकडे

गुकेशला या वर्षाच्या अखेरीस डिंग लिरेनला आव्हान देताना सर्वात तरुण जगज्जेता बनण्याची संधी असेल. मॅग्नस कार्लसन आणि गॅरी कास्पारोव्ह हे 22 व्‍या वर्षी जगज्‍जेते बुद्धीबळपटू झाले होते. गुकेश हा विश्वनाथन आनंद यांच्यानंतरचे कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट जिंकणारा दुसरा भारतीय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT