underworld don Dawood Ibrahim 
Latest

D’ Gang Member Arrested : दाऊदला दणका! जवळचा नातेवाईक ‘नजिर फकी’ला परदेशातून अटक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. दाऊदचा जवळचा नातेवाईक आणि साथीदार नजिर मोहम्मद फकी याला पोलिसांनी परदेशातून अटक केली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली आहे. नाजिर मोहम्मद हा १९९२ मध्ये मुंबईतील जे.जे रुग्णालयात झालेल्या गोळीबारात प्रमुख आरोपी होता. असे वृत्त इंडिया टिव्ही ने दिले आहे. (D' Gang Member Arrested)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजिर मोहम्मद फाकी याचे कुठलेही छायाचित्र उपलब्ध नव्हते. गेल्या तीन दशकांपासून तो पोलिसांना चकवा देत होता, मात्र तब्बल ३ दशकानंतर तो एजन्सींच्या हाती लागला आहे. तसेच दाऊद इब्राहिमने त्याची बहीण हसिना पारकरचा पती इस्माईल पारकर हिच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा वापर केला असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. (बातमी अपडेट होत आहे)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT