Latest

CWG 2022 England vs India : इंग्लंडला दणका, भारतीय महिला क्रिकेट संघ फायनलमध्ये

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्ट्रकूल क्रीडा (CWG 2022 England vs India) स्पर्धेतील क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडला नमवत फायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडला ४ धावांनी पराभूत केले. याद्वारे भारतीय संघ अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात यशस्वी ठरला. अंतिम सामन्यात पोहचतास भारताने आपले पदक निश्चित केले आहे. आता भारताची गाठ फायनल मध्ये दुसऱ्या सेमीफायनलमधील विजयी संघ ऑस्ट्रेलिया किंवा न्युझीलंड यांच्याशी पडेल.

शेवटच्या षटकात १४ धावांची आवश्यकता असताना गोलंदाज स्नेह राणा हिने अत्यंत भेदक गोलंदाजी केली. या अंतिम षटकात फलंदाज ब्रुट हिला बाद करत भारताने एक प्रकारे आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय संघाकडून एक झेल सुटला मात्र भारताला त्याचा फारसा फरक पडला नाही. अंतिम दोन चेंडूत १२ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी पाचव्या चेंडूवर इंग्लंडने १ धाव घेतली आणि शेवटच्या चेंडूवर इंग्लंडने षटकार ठोकला पण तोपर्यंत वेळ झाला होता. अशा प्रकारे भारतीय महिला संघाने इंग्लंडला ४ धावांनी पराभूत करत फायनल गाठली. (CWG 2022 England vs India)

भारताने (CWG 2022 England vs India) दिलेल्या १६५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या महिला संघाने देखिल ताबडतोब सुरुवात केली. इंग्लडच्या सलामीवीर सोफिया डंकले आणि डॅनियल वॅट यांनी चांगली सुरुवात करुन दिली. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर दीप्ती शर्माने सोफिया डंकले हिला पायचित करत बाद केले. डंकले हिने १० चेंडू १९ धावांची खेळी केली. यानंतर वॅट आणि ॲलिस कॅप्सी यांनी डाव सावरला. सातव्या षटकात ॲलिस कॅप्सी हिला भारतीय संघाने धाव बाद केले. कॅप्सीने ८ चेंडूत १३ धावा केल्या. यानंतर नवव्या षटकात स्नेह राना हिने डॅनियल वॅट हिला बोल्ड केले. वॅटने २७ चेंडूत ३५ धावा केल्या. वॅट बाद झाल्यावर इंग्लंची कर्णधार नताली स्कायव्हर आणि यष्टीरक्षक एमी जोन्स यांनी ८१ धावांवर ३ फलंदाज बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव सावरण्याचा पयत्न केला.

कर्णधार नताली स्कायव्हर हिने चौफेर फटकेबाजी सुरु केली होती. असे वाटत होते की नताली हा सामना भारताच्या खिशातून काढून घेऊन जाणार पण तेवढ्यात अठराव्या ओव्हर मध्ये जोन्स हिला धाव बाद करण्यात भारताला यश आले. जोन्स २४ चेंडूत ३१ धावा केल्या.
यानंतर देखिल कर्णधार नताली हिने बाऊचर हिला घेऊन डाव पुढे सरकावला. पण काही केल्या इंग्लंडची धाव गती कमी होत नव्हती. इंग्लंडचे फलंदाज चागल्या गतीने धावा घेते होते. अखेरच्या दोन षटकात इंग्लंडला जिंकण्यासाठी २७ धावांची आवश्कता होती. भारताकडून पूजा वस्त्रकार हिने गोलंदाजीचा भार सांभाळला. तिच्या षठकात तिसऱ्या आणि चौथ्या षटकात कर्णधार नतालीने एक षटकार आणि एक चौकार ठोकत इंग्लंडला विजया समीप आणले होते. पण, पाचव्या चेंडूवर नताली स्कायव्हर ही धाव बाद झाली. सीमारेषेवरुन स्मृती मानधना हिने अचूक चेंडू फेकत स्कायव्हर धाव बाद केले. अशा प्रकारे भारताने पुन्हा एका डावात परत येण्याची संधी मिळवली. नताली स्कायव्हर हिने ४३ चेंडूत ४१ धावांची महत्त्वाची खेळी केली.

यानंतर शेवटच्या षटकात इंग्लंडला १४ धावांची आवश्यकता होती. या षटकात तिसऱ्या चेंडूवर ब्रुंट हिचा झेल कर्णधार हरमनप्रीत कौर हिने झेलत इंग्लंडला आणखी एक झटका दिला. तसेच गोलंदाज स्नेह राना हिने अत्यंत चांगली गोलंदाजी करत शेवटच्या षटकात इंग्लंडला फक्त ९ धावा करु दिल्या. अशा प्रकारे भारताने इंग्लंडवर ४ धावांनी महत्त्वपूर्ण विजय नोंदवला.

भारताकडून भेदक जलदगती गोलंदाज रेणुका सिंग हिला फारसे काही करता आली नाही. तिला एक देखिल बळी घेता आला नाही. तर स्नेह राणा हिने दोन बळी मिळवले व दीप्ती शर्माला एक बळी घेता आला.

तत्पुर्वी राष्ट्रकूल क्रीडा (CWG 2022 England vs India) स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये, भारतीय महिला संघाने इंग्लंड महिला संघाविरुद्ध (CWG 2022 England W vs India W, 1st Semi-Final) नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधनाने जबरदस्त सुरुवात करून केवळ 23 चेंडूत अर्धशतक झळकावले. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा हिने १५ (१७ चेंडू) धावांची खेळी केली. यानंतर स्मृती मानधना अवघ्या ३२ धावात ६१ धावा करुन बाद झाली. इंग्लडच्या फ्रेया केम्पने एकाच षटकात दोघांचे बळी घेतले. त्यानंतर कर्णधार हमनप्रीत कौरला फ्रेया केम्प हिनेच २० धावांवर बाद केले. कौर हिने २० चेंडूत २० धावांची खेळी केली. तिच्यानंतर दीप्ती शर्मा ही देखिल २२ धावा करून बाद झाली. भारताची आघाडीची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकरला काहीच खेळी करता आली नाही ती शून्यावर धावबाद झाली. स्मृती मानधनाच्या अर्धशतकी खेळी आणि शेफाली, हरमनप्रीत व दीप्तीच्या छोट्या खेळींच्या जोरावर भारताने इंग्लंड समोर १६५ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लडकडून फ्रेया केम्पने ३ षटकात २२ धावा देत दोन बळी घेतले. तर के. ब्रुंट आणि एन. स्कीवर यांना एक एक बळी घेण्यात यश आले.

भारतीय महिला संघ : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका ठाकूर

इंग्लंड महिला संघ: डॅनियल वॅट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, नताली स्कायव्हर (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), माइया बाउचर, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, फ्रेया केम्प, इस्सी वोंग, सारा ग्लेन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT