पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसीने वार्षिक रँकिंग अपडेट जारी केले असून या अपडेटनंतर भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पहिले स्थान मिळवले आहे. बुधवारी आयसीसीने क्रमवारी जाहीर केली आणि त्यात भारतीय संघ अव्वल ठरला आहे. (ICC Rankings)
T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यातच विराट कोहलीनेही टी 20 संघाचे कर्णधार पद सोडले. त्यानंतर नवा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने खेळाच्या छोट्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आणि न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका सारख्या संघांना क्लिन स्वीप देत मालिका विजयाची नोंद केली. (ICC Rankings)
ICC T20 क्रमवारीत भारताने 270 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो भारतापेक्षा पाच रेटिंग गुणांनी मागे आहे. पहिल्या पाचमध्ये इतर तीन संघ अनुक्रमे पाकिस्तान (261), दक्षिण आफ्रिका (253) आणि ऑस्ट्रेलिया (251) आहेत. तर न्यूझीलंड 250 रेटिंग गुणांसह सहाव्या, वेस्ट इंडिज 240 रेटिंग गुणांसह सातव्या स्थानावर आहे. क्रमवारीत बांगलादेश (233), श्रीलंका (230) आणि अफगाणिस्तान (226) अनुक्रमे 8 व्या, 9 व्या आणि 10 व्या क्रमांकावर आहेत. (ICC Rankings)
नवा कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने कसोटी फॉर्मेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली असून त्यांनी आयसीसीच्या वार्षिक रँकिंग अपडेटमध्ये अव्वल स्थान कायम ठेवले आहे. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेत इंग्लंडला 4-० ने धुव्वा उडवला. यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या ऐतिहासिक दौऱ्यावर कसोटी मालिका 1-0 अशी जिंकून मोठे यश संपादन केले. (ICC Rankings)
वार्षिक कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया 128 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याचवेळी भारतीय संघ 119 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. टॉप पाचमध्ये न्यूझीलंड (111), दक्षिण आफ्रिका (110) आणि पाकिस्तान (93) अनुक्रमे 3 -या, 4 थ्या आणि 5 व्या क्रमांकावर आहेत. तर निराशाजनक कामगिरीनंतर ठरलेला इंग्लंड 88 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. (ICC Rankings)
न्यूझीलंडच्या संघाने 125 रेटिंग गुणांसह वनडे फॉरमॅटमध्ये पहिले स्थान कायम राखले आहे. तर, केवळ एक गुण कमी असणारा इंग्लंडचा संघ 124 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया (107), भारत (105) आणि पाकिस्तान (102) अनुक्रमे तिस-या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. (ICC Rankings)