Latest

‘डेटिंग अॅपवर भेट म्हणजे लग्नाचे आमिष नव्हे’ : बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन मंजुर

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली उच्च न्यायालयाने बलात्काराचा (Rape) आरोप असलेल्या पुरुषाला जामीन मंजुर केला आहे. या पुरुषावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. पण पीडित महिला आणि या पुरुषाची भेट डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती, तसेच त्यांच्यात मेसेजच्या माध्यामातून झालेल्या संवादात लग्नाचा कोठेही उल्लेख नाही, या आधारावर न्यायालयाने या पुरुषाला जामीन मंजुर केला आहे. न्यायमूर्ती विकास महाजन यांनी हा निकाल दिला आहे.

"दोघांची ओळख हिंज या डेटिंग अॅपवर झाली होती. त्यांची ओळख लग्नाच्या अॅपवर झालेली नाही हे महत्त्वाचे. शिवाय दोघांनी एकमेकांना बरेच मेसेज पाठवले आहेत, त्यात कोठेही लग्नाचा उल्लेख आलेला नाही," असे न्यायमूर्ती म्हणाले. याशिवाय याचिकाकर्त्या पुरुषाने त्याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल खोटी माहिती दिली होती, हे माहित असतानाही संबंधित महिला त्याच्यासोबत चार दिवस राहिली होती आणि त्यांच्यात वारंवार शारीरिक संबंध आले होते. ही बातमी बार अँड बेंचने दिली आहे.

या तपासात संबंधित महिलेचे फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो मिळाले होते, पण हे फोटो आणि व्हिडिओ या महिलेच्या संमतीने चित्रित केल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाजन म्हणाले, "प्राथमिकरीत्या दोघांतील संबंध हे परस्पर सहमतीने होते, आणि त्यात लग्नाचे वचन दिले होते, किंवा काही गैरसमज निर्माण करून दिले असेल असे वाटत नाही." (Rape)

संबंधित पुरुषावर कलम ३७६ आणि कलम ४२० नुसार गुन्हा नोंद झालेला आहे. यातील पुरुषाने त्याने आयआयटी, आणि लंडनमधील किंग्ज कॉलेजमधून डिग्री घेतल्याचे सांगितले होते. पण नंतर तो फक्त बीएसस्सी असल्याचे निष्पन्न झाले. महिलेने या पुरुषाला वैद्यकीय उपचारासाठी १.२ कोटी रुपये दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT