Latest

Budget 2022 : करदात्यांना बजेटमधून दिलासा मिळाला का? जाणून घ्या अधिक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

Budget 2022 :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून कार्पोरेट क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. कॉर्पोरेट टॅक्सवरील सरचार्ज १२ वरून ७ टक्क्यांपर्यंत कमी केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. दरम्यान, आयकरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पॉलिश्ड डायमंड्स आणि जेम्सवरील कस्टम ड्युटी ५ टक्के कमी करत असल्याची घोषणी त्यांनी केली आहे.

क्रिप्टोकरन्सीसारख्या आभासी चलनातून मिळणाऱ्या नफ्यावर ३० टक्के कर लावण्यात येणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. डिजिटल मालमत्तेचे हस्तांतरण करताना रकमेवर १ टक्के दराने कर आकारला जाईल. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १५ टक्के लागू होईल, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.

करदात्यांना सुधारीत रिटर्न भरण्याची परवानगी देण्यासाठी अर्थसंकल्पात नवीन तरतूद करण्यात आली आहे. सुधारीत रिटर्न संबंधित मूल्यांकन वर्षाच्या अखेरीस २ वर्षांच्या आत दाखल केले जाऊ शकते, असेही अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी वैयक्तिक करात कोणताही बदल केलेला नाही. आयकर स्लॅब किंवा दरांमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल केलेले नसल्याचे अर्थसंकल्पातून दिसून आले.

जानेवारी २०२२ या महिन्यात १ लाख ४० हजार ९८६ कोटी जीसएटी कलेक्शन झाले आहे. हे आतापर्यंतचे सर्वांधिक असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

सहकारी संस्थांना दिलासा

सहकारी संस्थांना पर्यायी किमान कर कमी करून तो १५ टक्के करण्यात आला आहे.

"२०२२ ते २३ मध्ये आरबीआयच डिजिटल चलन येणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. राज्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या घोषणेमुळे आभासी चलनांमा मान्यता मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे. आरबीआयकडून डिजिटल रुपया येणार आहे", अशी घाेषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच क्रिप्‍टोकरेन्सीच्‍या उत्‍पन्‍नावर ३० टक्‍के कर लागणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT