Latest

Corona Updates | देशात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत ५० टक्क्यांने वाढ, २४ तासांत ३,०१६ नवे रुग्ण

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत ५० टक्क्यांनी वाढ दिसून येत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,०१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट २.७३ टक्के आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १३,५०९ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गंभीर बाब म्हणजे देशात १५३ दिवसांनंतर रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत १,३९६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत देशातील ४ कोटी ४१ लाख ६८ हजार ३२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण ५ लाख ३० हजार ८६२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर २,२०,६५,९२,४८१ कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्लीत ३०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Updates)

देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा 'अलर्ट मोड'वर आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता.

देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढतेय. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ तसेच कर्नाटकमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवली जात आहे. अशात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रुग्णांना ट्रॅक करण्यासह कोरोना तपासण्या, लसीकरण  वाढवण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आली आहे.

गर्दी टाळा

देशात सध्या इन्फ्लूएंझा सब टाईप एच३एन२ आणि कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने नुकतीच राज्यांना एक संयुक्त ॲडव्हाजरी जारी केली आहे. ज्यात सार्वजनिक आरोग्य उपायांचे पालन करण्यावर भर दिला गेला आहे. गर्दी टाळावी, शिंकताना अथ‍वा खोकताना रुमाल/टिश्यूचा वापर करावा, गर्दीच्या आणि कोंदट ठिकाणी मास्कचा वापर करावा, हाताची स्वच्छता राखावी, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे, असे ॲडव्हाजरीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT