नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून देशात कोरोना संसर्ग झपाट्याने फैलावत आहे. देशात सलग उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. मागच्या २४ तासांत देशात नवे १ लाख ५९ हजार ६३२ रुग्ण आढळले. ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. (corona update)
२४ तासांत ४०,८६३ रुग्ण कोरोनातून बरे झाले. रुग्णसंख्या वाढल्याने रोजचा पॉझिटिव्हिटी रेट १०.२१ टक्के एवढा झाला आहे. सध्या देशात ५ लाख ९० हजार ६११ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात लसीचे १५० कोटी डोस देण्यात आले आहेत.
कोरोना पाठोपाठ ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे ३,०७१ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १४०९रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत १५ कोटी लोकांना कोरोनाचे लसीकरण देण्यात आले आहे.