Health in Copper  
Latest

Health in Copper : आरोग्यातील तांब्याचे महत्त्व

अनुराधा कोरवी

आपल्या शरीराचे आरोग्य राखण्याकरिता तांबा हा धातू महत्त्वाची भूमिका बजावत असतो. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचे कार्य व्यवस्थित चालू रहावे, याकरिता शरीरात तांब्याचे प्रमाण असणे आवश्यक असते. ( Health in Copper )

संबंधित बातम्या 

आपली चयापचय क्रिया चांगली रहावी, याकरिता तांबा या धातूचा उपयोग होतो. हिमोग्लोबीनच्या संश्लेषणाकरिता या धातूचा उपयोग होतो. लोहाच्या मदतीने हा धातू शरीरात तांबड्या रक्तपेशी निर्माण करण्याचे काम करत असतो. याखेरीज आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे कामही या धातूमुळे केले जाते. थायरॉईड ग्रंथींचे कार्य व्यवस्थित चालू रहावे याकरिताही हा धातू उपयुक्त असतो.

त्याचबरोबर हाडे बळकट बनवण्यासाठी हा धातू साहाय्यकारी ठरतो. मासे, शेंगदाणे, गहू, लिंबू, नारळ, पपई, सफरचंद, डाळी, बटाटा, मशरुम, हिरव्या पालेभाज्या यामधून आपल्या शरीराला कॉपरचा पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करायलाच हवा. शरीरात या धातूची कमतरता आहे, हे अनेक लक्षणांतून दिसू शकते.

अ‍ॅनिमिया झाल्यास, सांधे आणि हाडे दुखू लागल्यास, ऑस्टिओपोरोसीससारखी व्याधी झाल्यास, शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास, वारंवार संसर्ग होऊ लागल्यास, केस गळू लागल्यास, सतत थकवा जाणवू लागल्यास तसेच श्वसनाचा त्रास होऊ लागल्यास आपल्या शरीरात या धातूची कमतरता आहे, असे समजावे.

असे असले तरी अतिप्रमाणात हा धातू शरीरात गेल्यास त्याचाही त्रास होऊ शकतो. यकृत, मेंदू यासारख्या अवयवांत या धातूचे प्रमाण वाढले तर हिपेटायटिस, मूत्रपिंडाचे विकार होऊ शकतात. त्याबरोबरच आपल्या मेंदूच्या कार्यातही बिघाड होतो. ( Health in Copper )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT