Latest

सतत चिडचिड होण्यामागे ‘ही’ असू शकतात कारणे, जाणून घ्या अधिक

Arun Patil

नवी दिल्ली : राग हा मानवाच्या स्वभावाशी निगडीत आहे. कधी-कधी आपल्याला एखादी गोष्टी आवडली नाही, तर आपण चिडचिड किंवा राग व्यक्त करतो. ही समस्या काही लोकांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. काही व्यक्तींना खूप राग येतो, मग कारण असो किंवा नसो. जर तुम्हाला खूप राग येत असेल तर हा तुमचा स्वभाव आहे, असा अर्थ होत नाही. तर त्यामागेही काही वेगळं कारण असून शकतं. जर तुमच्या शरीरात काही जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असेल तर त्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे काही लोकांची चिडचिड होते. त्याबाबतची ही माहिती…

व्हिटॅमिन बी-6 ची कमतरता : व्हिटॅमिन बी-6 आपल्या शरीरात मेंदूच्या रसायनांप्रमाणे काम करते. व्हिटॅमिन बी-6 कार्य सुधारण्यास मदत करते. शरीरात व्हिटॅमिन बी-6 ची कमतरता असल्यास, यामुळे फिल गुड हार्मोनची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे व्यक्तीला अधिक राग येऊ शकतो.

व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता : व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा आणि सुस्ती वाटू शकते. त्यामुळे कधी कधी इच्छा नसतानाही तुम्हाला कमीपणा जाणवून चिडचिड होऊ शकते. व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे, तुम्हाला नैराश्यासारखी लक्षणे देखील जाणवू शकतात.

झिंकची कमतरता : शरीरामध्ये झिंकची कमतरता भासल्यासही मूड बदलू शकतो आणि तुमची चिडचिड होऊ शकते. झिंक आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचे. झिंकच्या कमतरतेमुळे, तुम्हाला नैराश्याची लक्षणेदेखील दिसू शकतात.

मॅग्नेशियमची कमतरता : मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अनेक वेळा तणावाचे व्यवस्थापन करण्यात अडचणी निर्माण होते. अशावेळी छोट्या-छोट्या गोष्टीवर तुमची चिडचिड होऊ शकते.

आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा : तुम्ही जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काही पदार्थ समाविष्ट करू शकता. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन बी-6 आणि व्हिटॅमिन बी-12 समृद्ध असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, एवोकॅडो आणि चिकन यामधून ही जीवनसत्त्वे मिळतात. याशिवाय झिंक आणि मॅग्नेशियमसाठी मासे, ब्रोकोली आणि स्प्राऊटस् यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT