नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे अधिकार उपराज्यपालांकडे राहतील, असे सांगत केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाला राज्यसभेत आव्हान देण्याचा निर्णय आप सरकारने घेतलेला आहे. या मुद्द्यावर आता काँग्रेसचे 'आप' ला समर्थन मिळाले आहे. दरम्यान काँग्रेसच्या या पाठिंब्यानंतर बंगळुरूमध्ये होणाऱ्या विरोधी आघाडीच्या बैठकीत 'आप' सामील होणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Congress support to AAP)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अध्यादेशाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून समर्थन मागितले होते. त्यावर ठोस भूमिका घेण्यास काँग्रेसने टाळाटाळ चालविली होती. तर पाटणा येथील विरोधी आघाडीच्या बैठकीदरम्यान आप नेत्यांनी यावरून काँग्रेसला सुनावले होते. मात्र आता काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी संसदेत या अध्यादेशाला विरोध केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून समर्थन मिळाल्यामुळे विरोधी आघाडीच्या बंगळुरूमध्ये 17-18 तारखेला होणाऱ्या बैठकीस आप हजर राहणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.