पुढारी ऑनलाईन: पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि पटियालाच्या खासदार प्रनीत कौर यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. पंजाबचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा यांनी केलेल्या तक्रारीवरून पक्षाविरोधी कारवायांसाठी कौर यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या लोकसभा खासदार प्रनीत कौर यांनी भाजपच्या बाजूने पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल काँग्रेस पक्षाने शुक्रवारी त्यांची हकालपट्टी केली. याप्रकरणी पंजाब राज्याचे काँग्रेस प्रमुख अमरिंदर सिंग राजा यांनी तक्रार दिल्यानंतर पक्षाच्या शिस्तपालन कृती समितीने (डीएसी) खासदार प्रनीत कौर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा यांनी याबाबतची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे. पंजाबमधील इतर काही वरिष्ठ काँग्रेस नेतेही हे मत मांडतात. पंजाबमधील इतर काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनीही कौर यांच्याबद्दल ही माहिती दिली आहे. या तक्रारीवरून शिस्तपालन कृती समितीने काळजीपूर्वक विचार करत, खासदार प्रनीत कौर यांना पक्षातून तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.