पणजी, पुढारी वृत्तसेवा : गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी गोव्यात दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी याच्या स्वागतासाठी पक्षाचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम, निवडणूक प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व इतर नेते उपस्थित होते.
राहुल गांधी हे नियोजित वेळेपेक्षा विलंबाने गोव्यात दाखल झाले. त्यामुळे मुरागावात तेथे घरोघरी जावून प्रचारदरम्यान त्यांना जास्त घरांना भेटी देता आल्या नाहीत. जीआरबी कॉलनीत त्यांनी चार – पाच घरांना भेटी घेत चहापान केले आहे. पुढील नियोजनानुसार, राहुल यांनी पणजीतील इंटरनॅशनल सेटरमधील दोन कार्यक्रमांना निघावे लागले.
हेही वाचलंत का?