नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : येत्या काही दिवसांमध्ये नवी दिल्लीत G-20 देशांची शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. परंतु, या जागतिक परिषदेच्या निमित्ताने कॉंग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. ही परिषद म्हणजे निवडणूक कार्यक्रम आहे, अशा शब्दात कॉंग्रेसने सरकारवर टीका केली आहे. महत्वाच्या मुद्दयांवरून सर्वसामान्यांचे लक्ष हटवण्यासाठी असे केले जात असल्याचे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे.
१९९९ मध्ये G-20 गटाची स्थापना झाली.१९ देश आणि युरोपिय युनियनचे सदस्य आहेत. गटाच्या स्थापनेपासून आतापर्यंत १७ देशांमध्ये आळीपाळीने G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आता भारतात ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. परंतु, देशात या परिषदेच्या निमित्ताने ज्याप्रकारच्या निवडणूक मोहिमा आणि वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे यापूर्वी दुसऱ्या देशांमध्ये बघायला मिळाले नाही. इतर महत्वाच्या मुद्दयांवरून सर्वसामान्यांचे लक्ष हटवण्यासाठीच हे केले जात असल्याचे रमेश म्हणाले.
कॉंग्रेस सरकारच्या काळात झालेल्या आयोजनांची आठवण करून देत रमेश म्हणाले की, नवी दिल्लीमध्ये १९८३ मध्ये १०० हून अधिक देशांची गटनिरपेक्ष शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर कॉमनवेल्थ देशांचे शिखर संमेलन देखील यशस्वीपणे आयोजित करण्यात आले होते. परंतु, तेव्हाच्या सरकारने निवडणुकीच्या फायद्यासाठी याचा वापर केला नाही. ५ एप्रिल २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना एक इवेंट मॅनेजर बनवले आणि नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान इवेंट मॅनेटमेंटचे करीत आहेत. अशी बोचरी टीका रमेश यांनी केली.
हेही वाचा;