पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या सुधीरने पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये दैदिप्यमान कामगिरी करत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले. या पदकाच्या कमाईने सहा सुवर्णासह भारताने आतापर्यंत वीस पादकांवर आपले नाव कोरले असून पदकतालिकेत भारत सातव्या क्रमांकावर आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे.
गोल्ड मेडल्स:
मीराबाई चानू, वेटलिफ्टिंग (महिला ४९ Kg)
जेरेमी लालरिनुंगा, वेटलिफ्टिंग (पुरुष६७ Kg)
अचिंत शिवली, वेटलिफ्टिंग (पुरुष ७३ Kg)
भारतीय महिला टीम, लॉन बॉल्स
भारतीय पुरुष टीम, टेबल टेनिस
सुधीर, पॅरा पॉवरलिफ्टिंग
सिल्वर मेडल्स:
संकेत सरगर, वेटलिफ्टिंग (पुरुष ५५ Kg)
बिंदियारानी देवी, वेटलिफ्टिंग (महिला ५५ Kg)
सुशीला देवी, ज्युदो (महिला ४८ Kg)
विकास ठाकुर, वेटलिफ्टिंग (पुरुष ९६ Kg)
भारतीय मिक्स्ड टीम, बैडमिंटन
तुलिका मान, ज्युदो (महिला ७८ Kg)
मुरली शंकर, लांब उडी
ब्रॉन्ज मेडल्स:
गुरुराज पुजारी, वेटलिफ्टिंग (पुरुष ६१ kg)
विजय कुमार यादव, ज्युदो (पुरुष ६० Kg)
हरजिंदर कौर, वेटलिफ्टिंग (महिला ७१ Kg)
लवप्रीत सिंह, वेटलिफ्टिंग (पुरुष १०९ Kg)
सौरव घोषाल, स्क्वॉश
गुरदीप सिंह, वेटलिफ्टिंग (पुरुष १०९ Kg)
तेजस्विन शंकर, एथलेटिक्स (पुरुष : उंच उडी)