पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रकूल स्पर्धा २०२२ मध्ये आज भारताच्या महिला खेळाडूंनी कमाल केली. एकीकडे महिला हॉकी संघाने न्यूझीलंडवर मात करत कांस्य पदक पटकावले. तर दुसरीकडे बॉक्सिंगमध्ये नीतू गंघासने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतील भारताचे हे १४ वे सुवर्णपदक आहे.
नीतूने फायनलमध्ये इंग्लंडच्या डेमी जेडला ५-०ने हरवले. बर्मिंगहॅम राष्ट्रकूल स्पर्धेंत भारताने आतापर्यंत एुकण पदकांची संख्या ४१ झाली आहे. भारताने ११ रौप्य आणि ११ कांस्य पदक पटकावली आहेत.