संग्रहित छायाचित्र. 
Latest

Common University Entrance Test: कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) 2023 चा निकाल जाहीर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) UG 2023 चा निकाल आज (दि.१५ जुलै) दुपारी जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज या परिक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. ज्यामध्ये 22,000 हून अधिक उमेदवारांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थ्यी इंग्रजीत होते, त्यानंतर जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात होते. या (Common University Entrance Test)  परीक्षेला बसलेले उमेदवार https://cuet.samarth.ac.in/ या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकणार आहेत.

कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट या प्रवेश परीक्षेत 5,685 उमेदवारांनी इंग्रजीमध्ये 100 टक्के गुण मिळवले, तर 4,850 उमेदवारांनी जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान/बायोकेमिस्ट्रीमध्ये अव्वल गुण मिळवले. तसेच  अर्थशास्त्रात 2,836 उमेदवारांनी सर्वाधिक गुण मिळवले आहेत.

CUET UG च्या परीक्षा 21 मे रोजी सुरू झाल्या आणि 23 जून रोजी संपल्या. मूळ वेळापत्रकानुसार परीक्षा 31 मे रोजी संपणार होत्या. पण या 23 जूनपर्यंत सुरू राहिल्या. 12 जुलै रोजी सुधारित उत्तर की प्रकाशित करण्यात आली. एकूण 411 प्रश्न उत्तरप्रतिकेच्या सुधारित आवृत्तीतून वगळण्यात आले. यानंतर यूजीसी प्रमुखांनी नुकतेच सांगितले की 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर केले जातील. यानुसार आज कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टचा निकाल जाहिर झाल्याचे UGC चे अध्यक्ष एम. जगदेश कुमार (Common University Entrance Test) यांनी स्पष्ट केले आहे.

असा पाहा CUET 2023 चा निकाल लाइव्ह:

पायरी 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या — cuet.samarth.ac.in

पायरी 2: होम पेजवर प्रदर्शित झालेल्या 'CUET UG 2023 Result' लिंकवर क्लिक करा.

पायरी 3: अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यासारखी लॉगिन क्रेडेन्शियल्स भरा

पायरी 4: CUET UG निकाल 2023 स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

पायरी 5: डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी तुमच्या निकालाची प्रिंट आउट घ्या.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT