मुंबई; पुढारी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. राज्याची प्रगती विरोधकांना दिसत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. त्यांनी भाजपशासित मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील आकडेवारीचा संदर्भ देत राज्यात सर्वांत कमी मद्याची दुकाने असल्याचा दावा त्यांनी केला.
रावणाचा जीव बेंबीत होता तसा काही जणांचा जीव मुंबईत गुंतलाय, द्वेषाची कावीळ बरी नव्हे असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- मला खोट बोलता येत नाही
- राज्यपालांचे महत्त्व विरोधी पक्षांनाही माहीत आहे
- हजारो किमी दूर आपण कोरोना कालावधीमध्ये ऑक्सिजन आणला
- दाऊद एके दाऊद करत विंदांच्या कवितेप्रमाणे देवेंद्र फडणवीसजी तुम्ही तेचं केलं
- काही जणांचे मृतदेह नदीत सापडले आम्ही तसं काही केलं नाही
- मुंबई पालिका शाळेत प्रवेशासाठी रांग लागते
- कोरोना काळात राज्य सरकारने उत्तम कामं केल
- द्वेषाची काविळ झालेल्यांना आमच्याकडे उत्तर नाही
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.