Latest

CM Eknath Shinde : आमच्या कामामुळे विरोधकांना धडकी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : "आमच्या कामामुळे विरोधकांना धडकी भरली आहे" असं वक्तव्य गडचिरोली दौऱ्यावर निघालेल्या  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना केले. या दौऱ्यादरम्यान ते नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसोबत दिवाळी साजरा करणार आहेत. ते भामरागड तालुक्यातील दोडराज पोलिस मदत केंद्रात जाणार आहेत. विरोधी पक्ष टीका करतात त्यांना करु देत. आम्ही आमच्या कामातून त्यांना उत्तर देवू असेही त्यांनी म्हटले आहे.  वाचा सविस्तर बातमी…

गडचिरोलीचा विकास हा ध्यास 

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान ते भामरागड तालुक्यातील दोडराज पोलिस मदत केंद्रातील पोलिसांसोबत दिवाळी साजरी (Diwali Celebration) करणार आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी पालकमंत्री असताना दरवर्षी गडचिरोली पोलिसांसोबत दिवाळी साजरी करायचो. तीच परंपरा कायम ठेवत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत आहे. पालकमंत्री असल्यापासून गडचिरोलीचा विकास व्हावा हा माझा ध्यास होता. नक्षलग्रस्त भागातील पोलिसांनाही दिवाळीचा आनंद घेता आला पाहिजे. आम्हाला नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे. शहरी नक्षलवादावर गृहखात्याचं लक्ष आहे. राज ठाकरेंच्या भेटीबद्दल विचारलं असता ते म्हणाले. राज ठाकरे  (Raj Thackeray) यांची  भेट ही राजकीय नव्हती.

CM Eknath Shinde : त्यांना टीका करु देत…

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करु असं म्हंटल होतं, या विधानावर विचारले असता ते म्हणाले, हे हास्यास्पद आहे. विरोधी पक्ष टीका करतात त्यांना करु देत आम्ही आमच्या कामातून उत्तर देवू. आमचं कामचं सांगेल सर्व काही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई विचारला असता म्हणाले, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना पूर्ण मदत करण्यात येईल. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या बोरोबर हे बळीराजाचं सरकार आहे.

काल (दि. २४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल येथे जावून भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागातील पोलिसांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधी गटाकडून टीका केली जात आहेत. पंतप्रधानांची ते कॉपी करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT