Latest

Ayodhya Ram Mandir | मुख्यमंत्री शिंदेंसह अख्ख मंत्रिमंडळ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येला जाणार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येतील राम मंदिराला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार २२ जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहिले नव्हते. ते आता मंत्रिमंडळाला सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहेत.

गेल्या सोमवारी (दि.२२ जानेवारी) अभिजित मुहूर्तावर रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी जन्मभूमीला श्रीराम मिळाला. शतकानुशतके हक्काच्या घराशिवाय व पुढे दशकानुदशके तंबूत राहण्याची वेळ ओढावलेल्या श्री रामलल्लांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षमायाचना केली. त्यांच्या मुख्य उपस्थितीत देशभरातील विविध पंथ-संप्रदायातील संतसमुदाय तसेच कोट्यवधी श्रीराम भक्तांच्या साक्षीने जन्मभूमीतील भव्यदिव्य मंदिरातील गर्भगृहात मंत्रोच्चारण, शंखध्वनीच्या गजरात श्री रामलल्लांना विराजमान करण्यात आले. त्यानंतर काल मंगळवारपासून अयोध्येतील श्री राम मंदिर सामान्य लोकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी ट्विट करत म्हटले होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT