Chris Hemsworth 
Latest

Chris Hemsworth : क्रिस हेम्सवर्थसोबत जॉर्ज मिलर बनवणार ‘थॉर 5’?; म्हणाला की…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलिवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थ थॉर चित्रपटामुळे खुपच चर्चेत आला होता. यानंतर क्रिस हेम्सवर्थने जगभरात मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. त्याच्या आगामी चित्रपटासाठी नेहमीच चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. याच दरम्यान दिग्दर्शक जॉर्ज मिलर यांनी क्रिस हेम्सवर्थ यांच्यासोबत 'थॉर 5' बनवणार असल्याची माहिती समोर आणली आहे.

  • जॉर्ज मिलर क्रिस हेम्सवर्थसोबत 'थॉर 5' बनविणार
  • 'फुरियोसा: अ मॅड मॅक्स सागा' हा चित्रपट लवकरच
  • जॉर्ज मिलरकडून क्रिस हेम्सवर्थचे कौतुक

क्रिस हेम्सवर्थसोबत 'थॉर 5' बनविणार

नुकतेच दिग्दर्शक जॉर्ज मिलरने 'कॉमिक बुक' ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता क्रिस हेम्सवर्थचे भरभरून कौतुक केलं आमि त्याचासोबत आगामी 'थॉर 5' चित्रपट बनविणार असल्याची माहिती दिली. यासोबत त्याने क्रिस एक चांगला अभिनेता असल्याचे सांगत त्याचे भरभरून कौतुक केलं आहे. यामुळे लवकरच आम्ही एकत्रित काम करणार असल्याचेही तो पुढे म्हणाला.

यानंतर मुलाखतीत जॉर्ज मिलर म्हणाला की, 'मी ख्रिस हेम्सवर्थसोबत कोणत्याही चित्रपटात काम करण्यास सज्ज आहे. मला त्याच्यासोबत काम करायचे आहे. तो एक अप्रतिम अभिनेता आहे. त्याच्याकडे खूप आश्चर्यकारक कौशल्ये आहेत. मला असे वाटते की, कोणतीही भूमिका बजावण्यासाठी तुम्हाला भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. त्यामुळे, मी माझ्या सर्व कलाकारांना खूपच भाग्यवान मानतो.

या मुलाखतातून लवकरच 'थॉर 5' चित्रपट येणार असल्याचे वृतत्‌ समोर आले आहे. मात्र, याविषयी चित्रपटातील कलाकार किंवा मिर्मात्याकडून कोणतीही अधिकृत्त माहिती मिळालेली नाही. यामुळे चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार याचीही माहिती गुलदस्त्यात आहे.

जॉर्ज मिलर आणि ख्रिस हेम्सवर्थ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा 'फुरियोसा: अ मॅड मॅक्स सागा' हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT