Latest

ख्रिस गेल – कर्टली अँब्रोस यांच्यात टी२० वर्ल्डकपच्या तोंडावरच वादावादी

backup backup

वेस्ट इंडीज क्रिकेटमधील माजी दिग्गज आणि आजी दिग्गज खेळाडूंमधला वाद टी२० वर्ल्डकपच्या तोंडावरच सुरु झाला. ख्रिस गेल – कर्टली अँब्रोस या दोन आजी माजी दोन दिग्गज खेळांडूंमध्ये चांगलीच जुंपली. ख्रिस गेलने अँब्रोस यांच्याबद्दल आता मला काडीमात्रही आदर राहिला नाही असे वक्तव्य केले.

कर्टली अँब्रोस यांनी ख्रिस गेलला टी२० वर्ल्डकप संघात ख्रिस गेलचे अंतिम अकरातील स्थान पक्के समजू नये. या वक्तव्यानंतर ख्रिस गेल आणि कर्टली अँब्रोस यांच्यात वादाची ठिणगी पडली. ख्रिस गेलने 'ज्यावेळी मी नुकताच वेस्ट इंडीज संघाशी जोडलो गेलो होते. त्यावेळी मी या माणसाकडे आदराने पाहत होतो. पण, आता मी माझ्या ह्रदयापासून बोलत आहे. मला माहीत नाही जेव्हापासून तो निवृत्त झाला आहे तेव्हापासून तो ख्रिस गेलच्या विरोधात का आहे. मी वैयक्तिकरित्या सांगतो की तुम्हीही त्यांना सांगा की ख्रिस गेल द युनिव्हर्सल बॉसला कर्टली अँब्रोसबद्दल आता काडीमात्रही आदर राहिलेला नाही.'

ख्रिस गेल आणि कर्टली अँब्रोस वाद : तर युनिव्हर्सल बॉस त्यांचा अनादर करेल

ख्रिस गेल हा २०१२ आणि २०१६ च्या टी२० वर्ल्डकप विजेत्या संघात होता. ख्रिस गेल पुढे म्हणाला की 'जर माजी वेस्ट इंडीजच्या खेळाडूने संघाबाबत नकारात्मकता दाखवत राहिले आणि संघाला पाठिंबा दिला नाही तर युनिव्हर्सल बॉस त्यांचा अनादर करेल. तसेच त्यांच्या तोंडावर शाब्दिक अनादर करण्यासही मागेपुढे पाहणार नाही.'

'माझा कर्टली अँब्रोस बरोबरचा संबंध संपला आहे. मला त्यांच्याबद्दल आदर नाही. ज्यावेळी ते मला दिसतील त्यावेळी मी त्यांना हे सांगेन. नकारात्मक होणे बंद करा, आगामी वर्ल्डकपसाठी संघाला पाठिंबा द्या. हा संघ निवडला गेलेला आहे आणि आम्हाला माजी खेळाडूंचा पाठिंबा हवा आहे.' असे ख्रिस गेल म्हणाला.

यापूर्वी कर्टली अँब्रोसने आगामी टी२० वर्ल्डकपमध्ये गेल हा वेस्ट इंडीज संघासाठी ख्रिस गेल हा पहिली पसंती नाही आहे असे वक्तव्य केले होते. त्यानंतरच ख्रिस गेल आणि कर्टली अँब्रोस वादाला सुरुवात झाली. ख्रिस गेलने २०२१ मध्ये १६ टी २० सामन्यात १७.४६ च्या सरासरीने फक्त २२७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर एकच अर्धशतक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT