kasturi

Chocolate cake recipe | घरच्या घरी बनवा चॉकलेट केक

अनुराधा कोरवी

साहित्य :

बिस्किटे 1 पुडा, कोको पावडर 2 चमचे, दूध 11 कप, साखर अर्धी वाटी, इनो 5 रु. चे पाकीट. (Chocolate cake recipe)

कृती :

प्रथम मिक्सरच्या साहाय्याने बिस्किटांचा बारीक चुरा करून घ्यावा. त्या चुर्‍यामध्ये साखर आणि कोको पावडर घाला. नंतर दूध घालून भज्याच्या पिठाप्रमाणे सरबरीत भिजवा. अ‍ॅल्युमिनियमच्या डब्याला सर्व बाजूने तूप लावून घ्या. गॅसवर लोखंडी तवा तापत ठेवा. वरील मिश्रण इनो घालून फेटून घ्या. मिश्रण फेटल्यानंतर ते डब्यामध्ये ओता. झाकण लावून डबा तव्यावर ठेवा. साधारण 30 मिनिटाने झाकण उघडून केक तपासून पहा. बिनअंड्याचा हा केक खूप छान लागतो. (Chocolate cake recipe)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT