पुढारी ऑनलाइन डेस्क : दक्षिण आफ्रिकेतून मागवलेले 12 चित्ते शनिवारी (दि. 18) भारतात दाखल होणार आहे. या चित्त्यांना देखील नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांप्रमाणेच मध्य प्रदेशातील कुनो नॅनशल पार्क मध्ये सोडण्यात येणार आहे. भारताच्या चित्ता पुनरुज्जीवन प्रकल्पाशी संबंधित व्यनजीव तज्ज्ञांनी याची माहिती दिली. Chittah Reintroductury
या 12 चित्त्यांपैकी 7 नर आणि 5 माद्या आहेत. शुक्रवारी संध्याकाळी हे चित्ते दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग येथील टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानातून भारताकडे रवाना केले जातील. हे चित्ते शनिवारी सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर हवाई दलाच्या तळावर पोहोचतील. त्यानंतर अर्ध्या तासाने त्यांना IAF हेलिकॉप्टरद्वारे 165 किमी अंतरावर श्योपूर जिल्ह्यातील केएनपी (कुनो नॅशनल पार्क) येथे नेले जाईल.
Chittah Reintroductury : कुनो येथे पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच दुपारी 12 च्या सुमारास त्यंना त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या खास बोमामध्ये ठेवण्यात येईल. अशी माहिती तज्ज्ञांनी सांगितली.
केएनपीचे संचालक उत्तम शर्मा म्हणाले की त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांसाठी 10 अलग ठेवलेल्या 'बोमाची' स्थापना केली आहे. यातील दोन सुविधांमध्ये चित्ता बांधवांच्या दोन जोड्या ठेवण्यात येणार होत्या. "आम्ही शनिवारी चित्त्यांना स्वीकारण्यासाठी आमची तयारी पूर्ण केली आहे," असे ही ते पुढे म्हणाले.
याविषयी अधिक माहिती देताना तज्ज्ञ म्हणाले, Chittah Reintroductury दक्षिण आफ्रिकेतील शिष्टमंडळाने गेल्या वर्षी 2022 मध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला कुनो उद्यानाला भेट दिली. तसेच जगातील सर्वात वेगवान प्राणी चित्त्याला राहण्यासाठी अभयारण्यातील व्यवस्था आणि वातावरण पोषक आहे का याची पाहणी केली. त्यानंतर गेल्या महिन्यात दोन्ही राष्ट्रांमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला. प्रत्येक चित्त्यामागे भारताकडून 3000 डॉलर घेण्यात आले आहेत. हे एकूण 12 चित्ते आहेत. थोडक्यात 36000 डॉलर या चित्त्यांसाठी भारत सरकारने दक्षिण आफ्रिकेला दिले आहे. दक्षिण आफ्रिकेतील हे चित्ते गेल्या वर्षीच येणार होते. तशी योजना सरकारकडून आखण्यात आली होती. मात्र दोन्ही देशांतील करारावर स्वाक्षरी न झाल्याने यासाठी विलंब झाला.
हे ही वाचा :