Latest

Sky Eye Telescope : पृथ्वी पलीकडे जीवसृष्टीचे पुरावे मिळाल्याची शक्यता : चीनचा दावा

रणजित गायकवाड

बीजिंग, पुढारी ऑनलाईन : चीनच्या स्काय आय या टेलेस्कोपला (Sky Eye Telescope) पृथ्वी पलीकडे जीवसृष्टीचे पुरावे मिळाल्याची शक्यता आहे, असा दावा चीनने केला आहे.

चीनमध्ये काही वर्षांपूर्वी स्काय आय हा महाकाय टेलेस्कोप (Sky Eye Telescope) उभारण्यात आला आहे. या टेलेस्कोपने पृथ्वी पलीकडून येणारे जीवसृष्टीचे सिग्नल पकडल्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त चीन सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेली या वृत्तपत्राने दिले आहे.

स्काय आय (Sky Eye Telescope) ही जगातील सर्वांत मोठी रेडिओ टेलेस्कोप आहे. या टेलेस्कोपने नॅरो बँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल पडकले आहेत. हे सिग्नल या पूर्वी मिळालेल्या सिग्नलपेक्षा वेगळे आहेत. यावर संशोधक सध्या काम करत आहेत.

बीजिंग नॉर्मल युनिर्व्हसिटी, चायनिज अॅकादमी ऑफ सायन्स, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया या संस्थानी एकत्र येत पृथ्वी पलीकडील जीवसृष्टी शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या टीमचे प्रमुख शास्त्रज्ञ झांग टोंजे यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

हे सिग्नल्स रेडिओ लहरीतील अडथळाही असू शकतात, त्यामुळे यावर अधिक संशोधन झाले पाहिजे, असे झांग यांनी म्हटले आहे. पण या वृत्तपत्राच्या वेबसाईटवरून हे वृत्त काही काळानंतर हटवण्यात आले. पण तोपर्यंत ही बातमी सोशल मीडियावर ट्रेंड करत होती.

स्काय आय चीनच्या गुईझो प्रांतात आहे. याचा व्यास तब्बल ५०० मीटर इतका मोठा आहे. पृथ्वीच्या पलीकडे जीवन शोधण्यासाठीच ही टेलेस्कोप उभारण्यात आली आहे. २०२०मध्ये या टेलेस्कोपवर काही संशयास्पद सिग्नल मिळाले होते. त्यानतर २०२२मध्ये पुन्हा असेच संशयास्पद सिग्नल मिळाले होते. स्काय आय ही टेलेक्सोप अत्यंत कमकुवत असे रेडिओ सिग्नलही पकडू शकते. त्यामुले परग्रहवासी असतील तर त्याचे पुरावे शोधण्यासाठी ही टेलेस्कोप फार उपयुक्त ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT