Child Stuck in washing machine 
Latest

Child Stuck in Washing Machine : मूल वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये अडकले अन् आईने…(पाहा व्हिडिओ)

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Child Stuck in Washing Machine : लहान मुले खेळत असताना अनेक वेळा ते आपल्याच चुकीमुळे अशा एखाद्या ठिकाणी अडकतात की अनेकदा ते त्यांच्या जिवावर बेतत असते किंवा त्यांच्या जीव धोक्यात येतो. असाच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर समोर आला आहे. हा व्हिडिओ विदेशातील आहे. यामध्ये एक मूल वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये अडकलेले दिसत असून बचाव पथक त्याला बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घेत आहे, असे या व्हिडिओत दिसत आहे. डेली मिररने त्याच्या इन्स्टाग्राम अकांउंट वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आज तक या हिंदी वेबसाईटने याचे वृत्त दिले आहे. 

Child Stuck in Washing Machine : आईला मुलाचे किंचाळणे ऐकू आले आणि ती धावली

आई आपल्या दैनिक कार्य करत असताना हे मूल घरात खेळत होते. खेळताना हे लहान मूल वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये अडकले. दरम्यान हे मूल वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये कसे अडकले हे मात्र समजले नाही. मात्र, आईला आपल्या मुलाचे किंचाळणे आणि रडणे ऐकू आले. त्यामुळे तिने आवाजाच्या दिशेने धाव घेतली आणि तिला मूल वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये अडकल्याचे लक्षात आले. तिने तातडीने आपल्या मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मूल अशा पद्धतीने अडकले होते की त्याला बाहेर काढणे कठीण होते. म्हणून आईने तातडीने तिने आपत्कालीन सेवांना कॉल लावला.

Child Stuck in Washing Machine : बचाव पथकाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर मूलाला बाहेर काढण्यात यश

अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच ते तातडीने या मुलाच्या घरी पोहोचले. हे मूल अशा प्रकारे ड्रायरमध्ये अडकले होते की त्याचे डोके आणि चेहरा देखील दिसत नव्हते. त्याचे फक्त पाय वरच्या दिशेने दिसत होते. या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की अग्निशमन दलाच्या जवानांनी मशीन पूर्णपणे उघडून ड्रायरला बाहेर काढले. या ड्रायरमध्ये मूल अशा प्रकारे अडकले की बाहेर फक्त त्याचे हात आणि पाय दिसत आहेत. त्यानंतर, त्यांनी मशीनमधून ड्रायर कापला आणि मुलाला बाहेर काढले. व्हिडीओमध्ये समजते की, मदत करण्यास आणखी थोडा विलंब झाला असता तर मुलाला वाचवणे अशक्य झाले असते.

Child Stuck in Washing Machine :

दरम्यान, हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक जण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. डेली मिररने हा व्हिडिओ 25 जुलैला इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.  त्यावर आतापर्यंत ८१, ४६५ लाइक्स मिळाले आहेत.

"कोणाच्याही मदतीशिवाय लहान मुले स्वतःला सर्वात विचित्र ठिकाणी पोहोचवू शकतात जे सहसा या आश्चर्यकारक सारख्या बचाव दलाला आश्चर्यचकित करतात. आपण नेहमी लहान मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. जर ते 5 मिनिटांपेक्षा जास्त शांत असतील.. त्यांना त्वरीत शोधा!" असे एका व्हिवरने म्हटले आहे.

"तर एकाने याला फेक व्हिडिओ म्हणत ही जवानांसाठीची एक ट्रेनिंग कवायत असल्याचे म्हटले असून ड्रायरमध्ये मूल नसून डॉल ठेवली आहे, असे म्हटले आहे."

"अशा प्रकारे मूल वॉशिंग मशिनमध्ये अडकू शकते का? असा प्रश्न केला आहे."

तर अनेक जणांनी वेगवेगळ्या स्माईलीतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT