मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
Latest

रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे’

backup backup

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील एकनाथ शिंदे यांनी दर्शवली आहे. या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

आषाढी वारी अगदी 2-3 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे यंदाच्या वारीला गालबोट लागलं होतं. मात्र वारकऱ्यांच्या मदतीला खुद्द 'एकनाथ' धावून आल्याने सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी तत्पर असलेला मुख्यमंत्री अशी शिंदे यांची ओळख नव्याने अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT